धुळ्यात पहिल्या फेरीअखेर भाजप, कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:23 AM2018-12-10T11:23:12+5:302018-12-10T11:25:28+5:30
लवकरच पहिला निकाल जाहीर होणार, उत्सुकता कायम
आॅनलाईन लोकमत
धुळे- महानगरपालिका महापालिका निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजेपासून सुरू झालेली असून पहिल्या एक तासात पहिल्या फेरी अखेर भाजप २२ तर कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस १४ जागांवर आघाडीवर आहेत. मात्र अद्याप एकही निकाल हाती आलेला ानही.
महानगरपालिकेच्या मतमोजणीला सकाळी १० वाजेपासून नगावबारी येथील शासकीय गोदामात सुरू झालेली आहे. यासाठी ४५ टेबल लावण्यात आलेले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मतमोजणीची पहिली फेरी पार पडली. त्यात भाजप २२, कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस १४, शिवसेना तीन, लोकसंग्रामचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. यात महापौर तथा राष्टÑवादीच्या उमेदवार कल्पना महाले, भाजपचे शीतल नवले, अमोल मासुळे, चंद्रकांत सोनार, देवा सोनार यांचा समावेश आहे. तर आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी व लोकसंग्रामच्या उमेदवार हेमा गोटे या २९० मतांनी आघाडीवर आहेत. मात्र अद्याप एकही निकाल हाती आलेला नाही.
दरम्यान मतदान केंद्रातील वायफाय बंद करा अशी मागणी राष्टÑवादीचे रवी रणसिंग यानी केली आहे.