आदिवासी बांधवाच्या रोजगारासाठी बंधाऱ्यात टाकली मत्स्यबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 01:25 PM2020-07-18T13:25:07+5:302020-07-18T13:25:25+5:30

शिरपूर पॅटर्न : आंबे परिसरातील बंधारे ओव्हर फ्लो

Fish seeds thrown in the dam for employment of tribal brothers | आदिवासी बांधवाच्या रोजगारासाठी बंधाऱ्यात टाकली मत्स्यबीज

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील आंबे परिसरात असलेले ‘शिरपूर पॅटर्न’चे बंधारे ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्या बंधाºयात मत्सबीज टाकून परिसरातील रहिवाशांना रोजगार मिळावा या उद्देशाने टाकण्यात आले़
गेल्या १७ वर्षापासून तालुक्यात ‘शिरपूर पॅटर्न’ अंतर्गत बंधाºयाचे कामे सुरू आहेत़ आतापर्यंत २५२ बंधारे बांधून पाणी अडविण्यात येत आहेत़ अद्यापही तालुक्यात अनेक भागात बंधाऱ्यांचे कामे सुरू आहेत़ गेल्या पंधरवाड्यात सांगवी मंडळात जोरदार पाऊस झाल्यामुळे त्या भागातील नदी-नाले, बंधारे ओव्हर फ्लो होवून वाहत आहेत़ रोहिणी, खंबाळे, आंबे परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे त्या भागात असलेले शिरपूर पॅटर्नचे बंधारे ओव्हर फ्लो होवून वाहत आहेत़
आंबे येथील विकास सोसायटीचे चेअरमन रमेश रामचंद्र माळी यांच्या शेतालगत असलेले चारही बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत़ रोहिणी-भोईटी परिसरातील बंधारे ही ओव्हर फ्लो झाले आहेत़ आंबे येथील बंधाºयात भूपेशभाई पटेल यांनी परिवार व नातवान सोबत पाण्यात मत्स्यबीज टाकून वृक्षरोपण केले़
या बंधाºयात मत्सबीज टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर परिसरातील आदिवासी बांधवाना रोजगार उपलब्ध करून त्यांचे आर्थिक जीवनमान बदलणे तसेच आरोग्यदायी पौष्टिक आहार निर्माण करणे या हेतूने टाकण्यात आलेत़
तीन प्रकारचे भारतीय कार्प (कटला, रोहू, मृगळ) व कोंबडा (स्कॉर्पीयन फिश) हे बीज बंधाºयात सोडण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, केतकीबेन मुकेशभाई पटेल, कृतिबेन भूपेशभाई पटेल आदी उपस्थित होते.

Web Title: Fish seeds thrown in the dam for employment of tribal brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.