माथेफिरूंकडून पाच गाड्यांची नासधूस

By admin | Published: April 10, 2017 12:26 AM2017-04-10T00:26:00+5:302017-04-10T00:26:00+5:30

शहरात गेल्या आठवड्यात ४ वाहनांच्या काचा फोडल्या होत्या, लोकांमध्ये घबराट

Five Busters Destroyed by Mothafiru | माथेफिरूंकडून पाच गाड्यांची नासधूस

माथेफिरूंकडून पाच गाड्यांची नासधूस

Next


शिरपूर : शहरात गेल्या आठवड्यापासून माथेफिरूंकडून वाहनांच्या काचा फोडण्याचे सत्र  थांबता-थांबेना झाले आहे. रविवारी रात्री १२़३० ते १़३० वाजेच्या सुमारास माथेफिरूने पाच गाड्यांच्या काचा फोडल्या.
विशेषत: जळगाववाला-बोहरी यांच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या गाडीच्या काचा पहारेकरीला दम देऊन फोडल्या गेल्या. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या ५ वाहनांच्या काचा माथेफिरूंनी फोडल्या आहेत. सदर माथेफिरू सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले असून त्यांचा शोध सुरू आहे़ यासंदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
९ रोजी रात्री १२़३० ते १़३० वाजेच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. दलालनगरातील रहिवासी  मुस्तफाभाई जळगाववाला यांनी त्यांच्या बंगल्यात गाडी क्रमांक एमएच १८-एजे-७५५३ लावली होती़
विशेषत: या बंगल्याबाहेर रात्रीच्या वेळी पहारेकरी असतो़ अज्ञात माथेफिरूंनी त्यास दम देऊन कंपाऊंडमध्ये प्रवेश करून गाडीच्या काचा फोडून पसार झालेत़ सदर घटनेत ४०-५० हजारांचे नुकसान झाले आहे़
घटनेचे वृत्त पहारेकरी यांनी डॉ़ तस्नीमबेन जळगाववाला यांना कळविताच त्यांनी लगेच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्याशी संपर्क साधून कळवले़, ते ही पोलिस पथकासह लगेच दाखल झालेत़ बंगल्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका मोटारसायकलीवर ट्रिपल सीट आलेले माथेफिरू कैद झाले असून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस पथक करीत आहे़
यानंतर माथेफिरूंनी सुभाष कॉलनीतील २ तर काझीनगरातील २ असे वाहनांच्यादेखील काचा फोडून नुकसान केल्याची घटना घडली़
गेल्या आठवड्यातच दलालनगरातील रहिवासी भुसार मालाचे व्यापारी राजेश ताराचंद अग्रवाल यांच्या घरासमोर लावलेली गाडी क्रमांक एमएच १८-एजे ३८ च्या काचा फोडल्या होत्या़
त्याचवेळी चंद्रशेखर बाऊस्कर यांची करवंद नाक्याजवळील हॉटेल मल्हार रेजेन्सीसमोर लावलेली गाडी क्रमांक एमएच १९-बीजी ५०५०, हॉटेल साहेबासमोरील सोनवणेनगरात विश्वास बडगुजर यांची एमएच ०३-बी ५११७, याच घरासमोर राहणारे दिगंबर दौलत माळी यांच्या अंगणात उभी असलेली गाडी क्रमांक एमएच १८-डब्ल्यू ७१५९ हिच्यादेखील काचा फोडून नुकसान केल्याची घटना घडली होती़
गेल्या आठवड्यात एकाच वेळी माथेफिरूंनी चार वाहनांच्या काचा फोडून मोठे नुकसान केल्याची घटना घडली होती़
काल झालेल्या घटनेत एका दुचाकी गाडीवर ट्रिपल सीट आलेल्या माथेफिरूंनी ५ वाहनांच्या काचा फोडल्यात तर गतआठवड्यात दोन दुचाकी गाडीवर असलेल्या चार जणांनी या वाहनांचे नुकसान      केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे़

पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी
गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येथील आऱसी़पटेल कॉलेजचे प्राचार्य डॉ़डी़आऱपाटील यांच्या घरासमोर लावलेली कार अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना ताजी असताना पुन्हा या घटना घडल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे़
पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून रात्री दहा वाजेनंतर ग्रुपने फिरणाºया युवकांवर तसेच निमझरी व करवंद नाका परिसरात रात्री उशिरापर्यंत टवाळखोर मुले धुमाकूळ घालत असून अशांवरदेखील कारवाई करण्याची मागणी केली जात आहे़
करवंद नाक्याजवळ पोलिस चौकी होऊन तेथे कायमस्वरूपी पोलीस पथक नियुक्त करावे़ जेणेकरून काही घटना घडल्यास तेथील पोलीस पथक लगेच नाकाबंदी करू शकतात़ हा परिसर रात्री उशिरापर्यंत गजबजलेला असतो़, त्यामुळे परिसरात टवाळखोरांची वर्दळ असते़

Web Title: Five Busters Destroyed by Mothafiru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.