धुळ्यात पाच बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 05:08 PM2018-05-06T17:08:58+5:302018-05-06T17:08:58+5:30

धार्मिक : नवयुवक सर्व शाखीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन; सवाद्य मिरवणुकीने वेधले लक्ष

Five Dwarves' collective concert ceremony in Dhule | धुळ्यात पाच बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा

धुळ्यात पाच बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा

Next
ठळक मुद्देकार्यक्रमात धीरज वैभव कुलकर्णी, तन्मय सखाराम कुलकर्णी, दिपेन अमोल नाटेकर, गोविंद किशोर तिवारी व वेदांत सुहास गर्गे यांचे उपनयन संस्कार संपन्न झाले. हर्षल जोशी, पंकज धर्माधिकारी, कुणाल सरदेशपांडे , गुणवंत जहागिरदार, सतीश मुळे गुरूजी यांनी पौराहित्य केले. भारतीय संस्कृती फार जुनी व वैशिष्टपूर्ण अशी आहे. या संस्कृतीचा अभ्यास विदेशातील लोकही करू लागले आहेत. अशा परिस्थितीत आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे.तसेच बटुंनी उपनयन संस्कारानंतर दररोज संध्या करावी, असे आवाहन मान्यवरांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  : गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमाद्वारे समाजात कार्य करणा-या नवयुवक सर्व शाखीय ब्राह्मण महासंघातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही रविवारी सामूहिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पाच बटुंचे सामूहिक उपनयन संस्कार पार पडले. दरम्यान, यानिमित्ताने सकाळी बटूंची सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली होती. 
शहरातील पारोळारोडवरील डोंगरे महाराज नगरातील श्री गणेशालय मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याप्रसंगी सदगुरू पद्मनाभ स्वामी महाराज संस्थानचे मठाधिपती भाऊ महाराज रूद्र, कमलनयन स्वामी महाराज संस्थानचे मठाधिपती संजय बुवा महाराज, शिरपूर ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास वैद्य आदी उपस्थित होते. 
समाजबांधवांनी दिली आर्थिक मदत 
सामूहिक व्रतबंध सोहळ्यानिमित्त पाचही बटुंची रविवारी सकाळी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. समाजातील अनेक मान्यवरांनी भरघोस आर्थिक मदत दिल्याने हा सोहळा यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. 
मान्यवरांनी केले बटुंना मार्गदर्शन 
संजय बुवा महाराज यांनी बटुंना व्रतबंध संस्कार, त्रिकाल संध्या, यज्ञोपवित धारणाचे महत्त्व सांगितले. उपनयन संस्कारानंतर बटुंची आचरण पद्धती कशी असली पाहिजे? याविषयी देखील त्यांनी मार्गदर्शन केले. महासंघाचे अध्यक्ष चंदूभाऊ जोशी, पुरोहित आघाडीचे राजू निफाडकर गुरूजी, डॉ. महेश घुगरी, शशी पाठक, निखिल वैद्य, महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्या कुलकर्णी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय जोशी यांनी केले. यशस्वीतेसाठी  आनंद कुलकर्णी, महेश जोशी, एम. बी. जोशी, अण्णा जोशी, दत्ता कुलकर्णी, नीलेश भंडारी, नटराज जोशी, भूषण देवळे, श्रीराम कुलकर्णी, दिनेश कुलकर्णी, शेखर कुलकर्णी, नाना शुक्ल, सी. पी. भट, स्वप्नील कुलकर्णी, चंद्रकांत जोशी, महिला आघाडीच्या शरयू जोशी, शुभांगी जोशी, प्राजक्ता जोशी यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: Five Dwarves' collective concert ceremony in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.