वीज पडल्याने पाच बकऱ्या, चार कोंबड्या मृत्यूमुखी; चुडाणे शिवारातील मध्यरात्रीची घटना
By अतुल जोशी | Published: September 27, 2023 02:23 PM2023-09-27T14:23:43+5:302023-09-27T14:23:53+5:30
मंगळवारी रात्री दहा वाजेपासुन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
धुळे: शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे शिवारात वीज पडल्याने, पाच बकऱ्या व चार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. तर चार बकऱ्या गंभीर भाजल्या असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामुळे शेतकऱ्याचे जवळपास एक लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मंगळवारी रात्री दहा वाजेपासुन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. किशोर आडगळे यांनी सायंकाळी आपल्या शेतातील शेडमध्ये या बकऱ्या कोंबड्या कोंडुन घरी परतले. मध्यरात्रीच्या सुमारास वीज शेडवर पडली. यात शेडमधील काठेवाडी जातीच्या पाच बकऱ्या, चार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. तर चार बकऱ्या गंभीररित्या भाजल्या आहे. किशोर आडगळे सकाळी शेतात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती कळल्यावर घटनास्थळी मौजे मालपूरचे तलाठी नारायण माजोळकर, पोलीस पाटील बापु बागुल, पशुवैद्यकीय दवाखान्याचे व्रणोचार पी. बी. चव्हाण, यांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कुलदीप आडगळे अरुण धनगर उत्तम धनगर राकेश राजपूत दिनेश बागुल उपस्थित होते.