पाच कैद्यांनी तयार केल्या पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मनमोहक गणेश मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 05:16 PM2023-09-16T17:16:12+5:302023-09-16T17:17:06+5:30

मूर्ती तयार करणारे कैदी फुलाराम नवरामजी मेघवाड हे नाशिक कारागृहातून धुळे खुल्या कारागृहात आले.

Five inmates created adorable Ganesha idols made of eco-friendly Shadu clay | पाच कैद्यांनी तयार केल्या पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मनमोहक गणेश मूर्ती

पाच कैद्यांनी तयार केल्या पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मनमोहक गणेश मूर्ती

googlenewsNext

राजेंद्र शर्मा

धुळे- येथील खुले जिल्हा कारागृहातील चार जन्मठेपची शिक्षा भोगणारे कैदी आणि एक न्यायाधीन बंदी अशा पाच जणांनी आपल्या कलाकुशलाने तयार केलेल्या पर्यावरण पूरकर शाडू मातीच्या सुंदर, सुबक आणि मनमोहक १०१ गणेश मूर्तींच्या विक्रीच्या स्टॉलचा शुभारंभ शनिवारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी असा अभिनव उपक्रम राबविण्याच्या जिल्हा कारागृह अधीक्षक खुले जिल्हा कारागृहात बंद्यांचे सुधारणा व पुनर्वसन होण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून जल्मठेप झालेले 4 कैदी व 1 न्यायाधीन बंदी यांनी पर्यावरण पूरक शाडू मातीचे सुंदर , सुबक व मनमोहक अशा १०१ गणपतीच्या मूर्ती तयार केल्या आहेत.

जिल्हा कारागृहात पहिल्या वेळेस अतिशय चांगला उपक्रम राबविला आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते या मूर्ती विक्रीच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. मूर्ती तयार करणारे कैदी फुलाराम नवरामजी मेघवाड हे नाशिक कारागृहातून धुळे खुल्या कारागृहात आले. ते जन्मठेपची शिक्षा भोगत आहे. त्यांनी स्वत: तर मूर्ती तयार केल्या पण सोबतच गोपाल माधव गायकवाड, विलास लक्ष्मण कोळी, सोपान रघुनाथ काशीद व हरीश धीरुभाई पटेल या कैदी व न्यायाधीन बंदीलाही मूर्ती तयार करणे शिकविले.

उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, कैद्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे. या अभिनव उपक्रमामुळे कैद्यांच्या जीवनात उत्सव व आशेचे किरण निर्माण होणार आहे कैद्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्ती या पर्यावरण पूरक शाडू मातीच्या बनवलेल्या असल्याने नागरिकांनी त्या विकत घेण्याकरिता या स्टॉलला आवश्यक भेट द्यावी, असे आवाहनही केले. यावेळी कारागृह अधीक्षक विशाल बांदल, तुरुंगाधिकारी सचिन झिंजुर्डे, उदय सोनवणे, कैलास चौधरी, कमलाकर दुसाने, अनिल बोलकर, बाळू चव्हाण, विलास खलाणे, भदाणे गुरुजी, सुभेदार पांडूरंग चौरे, भगवान सरदार उपस्थित होते.

अशी आहे किंमत - पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची किंमत १ हजार ६०० ते ३ हजारापर्यंत आहे. कार्यक्रमात सुमारे १० मुर्तीची नोंदणी देखील झाली होती.
कैद्यांच्या कलेला चालना मिळावी व पूनर्वसन व्हावे हेतूने त्याला मूर्ती तयार करण्यास वरिष्ठांकडून परवानगी मिळवून दिली. त्यानंतर साहित्य पुरविण्यात आले. त्यातून या मूर्त्यांचा अविष्कार झाला आहे. नागरिकांनी स्टॉलला आवश्यक भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बांदल यांनी दिली.

Web Title: Five inmates created adorable Ganesha idols made of eco-friendly Shadu clay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे