धुळे जिल्ह्यात ट्रक-बसचा अपघातात पाच प्रवासी जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:28 PM2018-06-13T14:28:16+5:302018-06-13T14:28:16+5:30

बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला 

Five passengers were injured in a truck-bus collision in Dhule district | धुळे जिल्ह्यात ट्रक-बसचा अपघातात पाच प्रवासी जखमी 

धुळे जिल्ह्यात ट्रक-बसचा अपघातात पाच प्रवासी जखमी 

Next
ठळक मुद्देदहीवेलपासून एक कि.मी. अंतरावर झाला अपघातपाच प्रवासी जखमी, बसचालकामुळे अनर्थ टळला ट्रकचालकास अटक, गुन्हा दाखल 


लोकमत न्यूज नेटवर्क
दहीवेल, ता.साक्री : बस व ट्रक यांच्यातील अपघातात पाच बस प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवार सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गावापासून एक कि.मी. अंतरावर नागपूर-सुरत राष्टÑीय महमाार्गावर घडली. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी ट्रकचालकास अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 
साक्री बस आगाराची वापी-साक्री (क्र.एमएच २० डीएल १६४६) ही बस रोज दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास दहीवेल येथे पोहचते. बुधवारी गावापासून एक कि.मी. अंतरावर असताना दहीवेलकडून सुरतकडे भरधाव जाणारा ट्रक (क्र.जीजे ०४ एडब्ल्यू २२२३) बसवर धडकणार असताना बसचालकाने बस शेजारच्या भरावावर चढविली. मात्र तरीही ट्रक चालकाच्या बाजूने बसला मागे धडकला. त्यामुळे बसचा पत्रा मोठ्या प्रमाणात कापला गेला.  या अपघातामुळे बसमधील दिपाली नितेश मोहिते (१९) रा.नवापूर व ज्योती परशुराम पाटील रा.बलसाड, लहू मोरे (२), सोहम मोरे (६) व मंगल अशोक लष्कर, रा.चक्करबर्डी, धुळे हे पाच प्रवासी जखमी झाले. त्यातील दिपाली मोहिते हीच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून तिला धुळे जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. ज्योती पाटील यांच्याही डोक्याला दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत. उर्वरीत तिघांना किरकोळ मुका मार लागला आहे. या प्रकरणी बसचालक प्रकाश शिंदे यांचा जवाब दहीवेल पोलिसांनी घेतला असून ट्रकचालक गोविंद रामजीभाई सोळंके (रा.गुजरात) यास अटक केली. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
नागपूर-सुरत राष्टÑीय महामार्गाच्या फागणे ते नवापूर या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम  सध्या सुरू आहे. साईडपट्ट्यांना भरावाचा तसेच दिशादर्शक फलकाचा अभाव आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

 

Web Title: Five passengers were injured in a truck-bus collision in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.