जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा परदेशात झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:36 PM2019-12-31T22:36:48+5:302019-12-31T22:38:34+5:30

पिंपळनेरचा कांदा बांग्लादेश, श्रीलंकासह दुबई, मिरची उत्पादनात दोंडाईचा समिती अव्वल ; चार महामार्गावरील धुळ्यातील बाजार समिती

 Flag of the Agricultural Produce Market Committee abroad in the district | जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा परदेशात झेंडा

Dhule

Next
ठळक मुद्देराज्यातील ३०५ बाजार समित्यांपैकी ३० बाजार समित्यांची निवड शिंदखेडा उपबाजार समिती ई-नामकडे वाटचाल....बैल बाजारात पिंपळनेर समिती प्रसिध्दशिंदखेडा उपबाजार समिती येथील २७ व्यापारी गाळे भाडे तत्वावर पिंपळनेर परिसरात संपूर्ण शेती क्षेत्र बागायतदार असल्याने कांदा लागवड करतात़

चंद्रकांत सोनार ।

धुळे : कृषी उत्पन्न समितीमधील व्यवहारात पारदर्शकता यावी, शेतकऱ्यांना रास्तदर मिळण्यासाठी केंद्र सरकारने राज्यातील निवडक कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रीय कृषी बाजार (ई- नाम ) योजना सुरू केली आहे़ या योजनेव्दारे धुळे व दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहार आॅनलाईन पध्दतीव्दारे सुरू आहे़ उर्वरित साक्री आणि शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज नवीन वर्षात आॅनलाईन सुरु होईल, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
३०५ पैकी ३० समित्याची निवड
राज्यातील ३०५ बाजार समित्यांपैकी ३० बाजार समित्यांची निवड करण्यात आली आहे़ त्यात धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा पहिल्या टप्यात समावेश करण्यात आला आहे़ बाजार समिती आॅलनाईन झाल्याने ६९ प्रकारच्या शेतीमालाची खेरदी-विक्री आॅनलाइन पध्दतीेने केली जात आहे़ त्यासाठी समितीला गेल्या वर्षी ३० लाखांचे अनुदान वस्तू स्वरूपात प्राप्त झाले आहे़
परराज्यात मालाची विक्री
महाराष्ट्र, गुजरात तसेच मध्यप्रदेश राज्याला जोडणारे महामार्गावर धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती ४७ एकर क्षेत्रात तयार आहे़ कापूस, गरभरा, गहू, दादर, मका, बाजारी, पालेभाज्या, मिरची अशा खरीब व रब्बी पिकांची आयात-निर्णात परराज्यातून बाजार समितीत होते़ जिल्ह्यातील एकमेव मोठी बाजारपेठ असल्याने शेतकरी बैल, म्हैस, बकरी अशा जनावरांची खरेदी विक्री करतात़ मिरची उत्पादनात देशात नावलौकिक दोडाईचा
दोडाईचा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापणा २० नोव्हेंबर १९३९ मध्ये झाली़ बाजार समितीचे विद्यमान चेअरमन नारायण पाटील आहेत. समितीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शिंदखेडा उपबाजार समिती येथील २७ व्यापारी गाळे भाडे तत्वावर दिले आहेत़ दोडाईचा बाजार समिती लाल मिरची खरेदी-विक्रीसाठी समिती देशात प्रसिद्ध असून यात करोडो रुपयाची उलाढाल होते. गहू ,मका, दादर, हरभरा पिक प्रामुख्याने महाराष्ट्रसह कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, पंजाब आदी राज्यात निर्यात होतो. केंद्र शासनाच्या धोरणानुसार दोंडाईचा बाजार समिती ई बाजार समिती म्हणून घोषित झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना भुसार माल व इतर शेती मालाचे पैसे शेती माल मोजल्यानंतर लगेच मिळतात़ समितीच्या कार्यक्षेत्रा व्यतिरिक्त नंदुरबार, साक्री, शहादा, शिरपूर तालुक्यातून शेतीमालाची आवक होते. समितीत १ अब्ज ९ कोटीं ७८ लाख ९४ हजार ५३३ रुपयाची उलाढाल झाली आहे़ बाजार समितीस १ कोटी ९ लाख ७८ हजार ९४५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
बैल बाजारात पिंपळनेर समिती प्रसिध्द
पिंपळनेर: पिंपळनेर उपबाजार समिती खान्देशात कांद्यासह बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळी व पावसाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते़ दर शुक्रवारी बैलांची खरेदी विक्री तर खरीप व रब्बी हंगामात भुसार मालाची व्यापार याद्वारे खरेदी-विक्री होत असतो. बाजार समितीची स्थापना १९६७ साली झाली आहे. येथील कांद्याला राज्यासह राजस्थान, झारखंड, पंजाब, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आदी राज्यात निर्यात होते़ पिंपळनेर परिसरात संपूर्ण शेती क्षेत्र बागायतदार असल्याने कांदा लागवड करतात़ त्यामुळे कांद्याची उलाढाल जास्त असते. त्यामुळे येथील कांदा बांगलादेश, श्रीलंका व दुबई आदी देशात निर्यात होते़ पिंपळनेर उपबाजार समिती अद्याप इ-बाजार समिती म्हणून घोषित झालेली नाही़ परंतू नवीन वर्षात समितीचे कामकाज इ बाजार पद्धतीने सुरु होतील. यासाठी आवश्यक तो पाठपुरावा समितीतर्फे करण्यात येत आहे.

शिंदखेडा उपबाजार समिती ई-नामकडे वाटचाल....
शिंदखेडा उपबाजार समितीची स्थापना २० नाव्हेंबर १९३९ मध्ये झाली़ तालुका लहान असल्याने बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी ४५ गाळे भाडेतत्वावर देण्यात आले आहे़ सोमवारी आठवडे बाजार असल्याने गुहू, मका,हरभरा अशा खरीब व रब्बी पिकांची आयात-निर्णात प्रामुख्याने कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात तसेच पंजाब राज्यातून होते़ केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार योजनेसाठी समितीची वाटचाल सध्या सुरू आहे़ केंद्र शासनाच्या भारतीय कपास निगम लि़(सीसीआय) अंतर्गत हमी भावानुसार कापूस शेतीमालाची खरेदी बाजार समिच्या कार्यक्षेत्रात होण्यासाठी दोंडाईचा येथील अभिषेक जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग फ ॅक्टरी तसेच केशरानंद जिनिंग फॅक्टरी व वर्धमान फॅक्टरी शिंदखेडा येथे कापूस खरेदी सुरू आहे़ त्यासाठी शेतकºयांना ४५ हजार क्किटल हमी भावाने खरेदी झालेली आहे़ दरम्यान शेतकºयांना हमी भाव मिळवून देण्याच्या प्रयत्न बाजार समितीकडून केला जातो़

Web Title:  Flag of the Agricultural Produce Market Committee abroad in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे