विमलनाथ मंदिरात ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 09:33 PM2018-12-11T21:33:34+5:302018-12-11T21:34:03+5:30

ध्वजाची शोभायात्रा : राज्यभरातून हजारो भाविकांची उपस्थिती

Flag hoisting in Vimalnath temple | विमलनाथ मंदिरात ध्वजारोहण

dhule

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बळसाणे : येथील विश्वकल्याणक जैन विमलनाथ मंदिरात ध्वजारोहण कार्यक्रम सोमवार १० डिसेंबर रोजी विधीनुसार पार पडला. प्रारंभी मंदिरात भाविकांनी धार्मिक भजन म्हटले. तसेच विश्वकल्याणक पटांगणातून सवाद्य ध्वजाची शोभायात्रा काढण्यात आली. 
येथील जैन विमलनाथ मंदिरातील शिखराचा मुख्य ध्वज बदलण्याची परंपरा मुंबई (विलेपार्ले) विभागातील आलाफभाई पंकज भाई (गांधी परिवार) यंदाही कायमस्वरूपी राखल्याचे कमलेश गांधी यांनी सांगितले. 
धुळे येथील जगदगुरु मंडळ व पार्श्व भैरव ग्रुप या भक्त मंडळांनी धार्मिक भजन, स्तवन सादर केले. 
याप्रसंगी १३ वे तीर्थंकर विमलनाथ भगवंताचे १८ अभिषेकाचे लाभार्थी इंदूबेन चंद्रहास बोरा परिवार मुंबई यांनी घेतले. ७० बेदी पुजा नासिक येथील पंडित दिनेश जैन यांनी केली. सदर कार्यक्रम जैन समाजातील खरतरगच्छाधिपती आचार्य श्री जिनमणिप्रभ सुरिश्वर महाराज, प.पू. चंपाकली गच्छागणिनी श्री सुर्यप्रभाश्री महाराज, प.पू. स्नेहसुरभी श्री पूर्णप्रभाश्री महाराज व प.पू. हषार्पूर्णाश्री महाराज आदी ठाणा ५ यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत पूजा करून साजरा झाला. याप्रसंगी बळसाणे, नेर, नंदुरबार, धुळे, जळगाव, शहादा, साक्री, शिरपूर, दोंडाईचा परिसरातील जैन समाजबांधव उपस्थित होते. संस्थेच्यावतीने जैन धर्मशाळेत महाप्रसाद वाटप केले.

Web Title: Flag hoisting in Vimalnath temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे