‘जलयुक्त’मध्ये वनविभागाचा सहभाग महत्त्वपूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 11:46 PM2017-01-18T23:46:54+5:302017-01-18T23:46:54+5:30

धुळे : जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून त्या माध्यमातून शिवार सुजलाम्-सुफलाम् करावयाचे आहे.

Forest department's involvement in water tanker is important! | ‘जलयुक्त’मध्ये वनविभागाचा सहभाग महत्त्वपूर्ण!

‘जलयुक्त’मध्ये वनविभागाचा सहभाग महत्त्वपूर्ण!

googlenewsNext


धुळे : जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून त्या माध्यमातून शिवार सुजलाम्-सुफलाम् करावयाचे आहे. या अभियानात वनविभागाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जलश्री-वॉटरशेड सव्र्हेलन्स अॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट जळगावतर्फे जलसंवर्धन : जलयुक्त शिवार अभियानाच्या आनुषंगाने संकल्पना, तांत्रिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम वनविभागाचे अधिकारी, कर्मचा:यांसाठी तीन दिवसांपासून सुरू होता. त्याचा समारोप नुकताच झाला. त्या वेळी जिल्हाधिकारी पांढरपट्टे बोलत होते. उपवनसंरक्षक नीनू सोमराज, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (रोहयो), उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), मिलिंद पंडित, डॉ.स्वाती संवत्सर या वेळी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढवायची आहे. त्यासाठी वनविभागातील अधिकारी, कर्मचा:यांनी तांत्रिकदृष्टय़ा कुशल असणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रशिक्षणातून मिळालेल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करतील. अन्य विभागातील अधिकारी, कर्मचा:यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले जाईल, असेही जिल्हाधिका:यांनी स्पष्ट केले.
उपजिल्हाधिकारी भारदे म्हणाल्या की, जलयुक्त शिवार अभियानात सहभागी अन्य विभागातील अधिकारी, कर्मचा:यांसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी उपयोग होईल. उपविभागीय अधिकारी मिसाळ म्हणाले की, वनविभागाचे जलयुक्त शिवार अभियानातील काम कौतुकास्पद आहे. या कामगिरीची माहिती लोकप्रतिनिधींनाही द्यावी, असेही नमूद केले. या वेळी प्रशिक्षणार्थीनीसुद्धा मनोगत व्यक्त केले.

Web Title: Forest department's involvement in water tanker is important!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.