माजी सैनिक, शहीदांच्या परिवाराचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 09:46 PM2019-08-28T21:46:08+5:302019-08-28T21:46:28+5:30

धुळे : जैन सोशल ग्रृप प्लॅटिनमतर्फे रंग दे तिरंगा फेस्टिव्हलचे आयोजन

Former soldier, family of martyrs | माजी सैनिक, शहीदांच्या परिवाराचा सत्कार

रंग दे तिरंगा फेस्टिव्हल कार्यक्रमात  धुळ्याचे अध्यक्ष राजेंद्र सिसोदिया यांना  फेडरेशनचा झेंडा देऊन सन्मानित करतांना जैन सोशल ग्रुप इंटरनेशनल फेडरेशनचे चेअरमन राजेंद्र धोका,सोबत ग्रुपचे सर्व संचालक़

Next

धुळे : शहरातील जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमतर्फे  हिरे भवन येथे ‘रंग दे तिरंगा’ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात   माजी सैनिक व शहीद सैनिक परिवाराचा विशेष सत्कार व  सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. 
   कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे,  जितेंद्र शहा,  पुणे येथील राजेंद्र धोका, प्रितेश ताथेड,  हेमंत मोदी, महेंद्र दुग्गड, राजेंद्र बंब, दिलीप कुचेरीया, प्रोजेक्ट चेअरमन राकेश जैन, चारुल सुराणा आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी दोन वीरमाता, दोन वीरपत्नी व एक निवृत्त कर्नल, दोन माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला़ रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला़ एका दिव्यांग व्यक्तीस तीन चाकी सायकल भेट देण्यात आली.  सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५१ हजाराचा निधी देण्यात आला. या वेळी नगावच्या विद्या विकास मंडळाच्या दिंव्याग विद्यार्थ्यांनी व लूक अ‍ॅण्ड लर्नच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तापर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली़ देशभक्तीपर गीतांवर आंतरशालेय समूह नृत्य व गायन स्पर्धा घेण्यात आली.  यात इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी  ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा झाली. समूह  गायन स्पर्धेत लहान गटात नॉर्थ पॉईंट स्कुल, सिस्टेल स्कुल, स्वेस उर्दू स्कुल  तसेच मोठ्या गटात नॉर्थ पॉइंट स्कूल, पोद्दार इंटरनेशनल स्कूल, स्वेस उर्दू स्कूल,यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. समूह नृत्य स्पर्धेत लहान गटात होरायझन इंग्लिश स्कूल, नॉर्थ पॉइंट स्कूल,  सिस्टेल स्कूल, यांनी तर  मोठ्या गटात नॉर्थ पॉइंट स्कूल, श्रीजी स्कूल, नेताजी डे स्कूल, यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला.  सर्व विजेत्या शाळांना स्मृती चिन्ह, व रोख पारितोषिक देण्यात आली.परीक्षक म्हणून  शेखर रुद्र, सिद्धार्थ बालिया, प्रीतम पाटील यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन कल्पना सिसोदिया, चंदना कुचेरीया यांनी केले. यशस्वीतेसाठी राजेंद्र सिसोदिया, आनंद ताथेड, चारुल सुराणा, महेश बाफना, उज्वल दुग्गड, प्रवीण कुचेरिया, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Former soldier, family of martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे