धुळे पोलिसांकडून साडेचार हजार वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:17 PM2020-04-24T22:17:09+5:302020-04-24T22:17:41+5:30
लॉकडाउनच्या महिन्याभरातील कारवाई : ३४३ जणांविरुध्द थेट गुन्हे दाखल, कारवाईचे सत्र सुरु
धुळे : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले असताना त्याची अंमलबजावणी धुळ्यात प्रभावीपणे केली जात आहे़ संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ३४३ जणांविरुध्द थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये २५ जणांना रितसर अटक करण्यात आली असून विनाकारण फिरणाºया ४ हजार ५३२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई करण्याचे सत्र सुरुच आहे़ कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आल्यानंतर साहजिकच धुळ्यात देखील त्याची प्रभावीपणे अंमजबजावणी केली जात आहे़ लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलेले असतानाच विनाकारण फिरणाऱ्यांना अटकाव करण्याचे धोरण पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्याकडून राबविण्यात आले़ शहरात दुचाकी घेऊन विनाकारण फिरणाºयांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांची दुचाकी जप्त करण्याच्या सूचना अधीक्षकांकडून देण्यात आल्या़ त्यासाठी शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये त्या त्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांना तैनात करण्यात आले़ त्यानुसार, शहरातील सातही पोलीस स्टेशनअंतर्गत २ हजार ५६९ दुचाकी जप्त केल्या असून त्यांच्याकडून ६ लाख ९४ हजार १०० रुपये दंड वसूल झाला आहे़ तर, शहर वाहतूक शाखेतंर्गत १ हजार ९६३ दुचाकी जप्त केल्या असून त्यांच्याकडून ४ लाख ३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केलेला आहे़ असे एकूण धुळे शहरातील सात पोलीस स्टेशन आणि शहर वाहतूक शाखा यांच्या माध्यमातून ४ हजार ५३२ दुचाकी जप्त करण्यात आलेल्या असून त्यांच्याकडून १० लाख ९७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे़
अजूनही ठिकठिकाणी विनाकारण दुचाकी घेऊन शहरात फिरणारे दिसून येत आहेत़ त्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची नितांत आवश्यकता आहे़ कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी प्रयत्न सुरु आहेत़ घरीच थांबा, सुरक्षित रहा असे आवाहन देखील करण्यात येत असताना प्रतिसादाची गरज आहे़
कारवाई सुरुच राहणाऱ़़
शहरात लॉकडाउन काळात विनाकारण फिरणाºयांना मज्जाव करण्यात येत असताना तरी देखील नियमांचे उल्लंघन केले जात आहेत़ नियमांचे उल्लंघन करणाºया शहरातील ३४३ जणांविरुध्द शहरातील विविध पोलीस ठण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ २५ जणांना अटक देखील करण्यात आली आहे़ अशा प्रकारची कारवाई सुरु राहणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांनी सांगितले़