धान्य खरेदीसाठी जिल्ह्यात चार केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:35 PM2020-05-18T21:35:46+5:302020-05-18T21:36:08+5:30
दिलासा : आधारभूत किंमत खरेदी योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : रब्बी पणन हंगामासाठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी धुळे जिल्ह्यात जिल्हा पणन अधिकारी यांच्यामार्फत चार खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय यादव दिली़
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक, प्रादेशिक कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फतही एक खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रांवर भरडधान्य खरेदीचा कालावधी ३० जूनपर्यंत राहील.
जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये ही केंद्र सुरु झाली आहेत़ धुळे, शिरपूर, साक्री येथे प्रत्येकी एक आणि शिंदखेडा तालुक्यातील एका केंद्राचा समावेश आहे़
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक, प्रादेशिक कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत धुळे, साक्री, पिंपळनेर, पिंपळनेर (महामंडळाचे खरेदी केंद्र.) आदी ठिकाणी खरेदी सुरु करण्यात आली आहे़
धुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी, धुळे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळ मर्यादित नाशिक, प्रादेशिक कार्यालय, नंदुरबार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे़