धुळ्यानजिक तिहेरी अपघातात चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 06:06 PM2019-06-12T18:06:11+5:302019-06-12T18:06:33+5:30

विचित्र घटना : ट्रक, टेम्पो व रिक्षा लळींग घाटात एकमेकांना धडकले

Four die in Dhulyanik triple crash | धुळ्यानजिक तिहेरी अपघातात चौघांचा मृत्यू

धुळ्यानजिक तिहेरी अपघातात चौघांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भरधाव वेगाने धुळ्याच्या दिशेने येणाºया ट्रकने रस्ता ओलांडून समोरुन मालेगावकडे जाणाºया टेम्पोला जोरदार धडक दिली़ या अपघातात टेम्पोचा चुराडा झाला आहे़ टेम्पोच्या मागे असणाºया रिक्षाचा पुढचा भाग दाबला गेला़ या तिहेरी अपघातात तिघे जागीच ठार तर एकाचा रूग्णालयात नेताना मृत्यू झाला़ अन्य तिघे जखमी झाले आहेत़ अपघाताची ही घटना मुंबई -आग्रा महामार्गावरील लळींग घाटात बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली़ 
एमएच १८ बीए २१९२ क्रमांकाचा ट्रक हा शिर्डी येथून मालेगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येत होता़ मुंबई आग्रा महामार्गावरील लळींग घाटात उतरती आणि वेगात असल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक हा विरुध्द दिशेने वळला़ त्याचवेळेस एमएच १७ बीडी ५२६९ क्रमांकाचा गोदावरी कंपनीचे दूध घेऊन जाणारा टेम्पो धुळ्याकडून मालेगावच्या दिशेने जात होता़ या टेम्पोला ट्रकने जोरदार धडक दिली़ धडक एवढी जोरात होती की टेम्पोच्या बाजूचा भाग अक्षरश: कापला जावून टेम्पोचे दोन तुकडे झाले़ तर टेम्पोच्या मागे असलेली एमएच १८ डब्ल्यू ५६२९ क्रमांकाच्या रिक्षेचाही चुराडा झाला होता़ टेम्पोला धडक दिल्यानंतर ट्रक हा घाटातील दरीत कोसळला़ ट्रकच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता़ अपघाताची ही घटना बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली़ 
या अपघातातातील मृतांमध्ये  अहमद अली साहेब अली (५०, रा़ मालेगाव), त्यांची पत्नी नौशाद बी अहमद अली (४५, रा़ मालेगाव) आणि त्यांची नात आलिया जाकीर अली (६) आणि अहमदाबाद येथील खॉजान यांचा समावेश आहे़ तर जखमींमध्ये ट्रकचालक सोकतखान करीमखान पठाण (२९, रा़ साक्री) विक्की नंदलाल ठाकरे (२५, रा़ सबगव्हाण, ता़ पारोळा, जि़ जळगाव) आणि अतुल चैत्राम पाटील (२०, रा़ दळवेल, ता़ पारोळा जि़ जळगाव) यांचा समावेश आहे़ 
अहमदअली आणि त्यांचा परिवार हा सुरत येथे काही कार्यक्रमासाठी गेले होते़ परत मालेगाव येथे येण्यासाठी ते रेल्वेने अमळनेरपर्यंत आले़ तेथून धुळ्यात आल्यानंतर ते टेम्पोतून मालेगावकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला़ अपघाताची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले़ अपघातातील जखमी आणि मृतांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात दाखल केले़ 

Web Title: Four die in Dhulyanik triple crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.