एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण
By admin | Published: April 1, 2017 12:45 AM2017-04-01T00:45:44+5:302017-04-01T00:45:44+5:30
धुळ्यातील मुल्ला कॉलनी : चाळीसगाव रोड पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा
धुळे : जाब विचारल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण केल्याची घटना शहरातील मुल्ला कॉलनीत घडली़ याप्रकरणी चार जणांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
याबाबत शाहीन सागर खाटीक (वय 33, रा़ मुल्ला कॉलनी, बिलाल मशीदजवळ, धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांची मुलगी शाळेतून घरी येत असताना तिला रुकसाना नईम अन्सारी हिने काळी म्हणून शिवीगाळ केली़ त्याबाबत 30 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जाब विचारण्याच्या कारणावरून रुकसाना अन्सारी, नईम अन्सारी (रा़ मुल्ला कॉलनी), बंटी व कादीर (पूर्ण नाव, गाव माहिती नाही) यांनी शाहिन खाटीक यांच्यासह त्यांचा पती, पुतण्या व जेठाणी यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ याप्रकरणी वरील चौघांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भादंवि कलम 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आह़े
चितोड येथे एकास मारहाण
धुळे तालुक्यातील चितोड येथे क्षुल्लक कारणावरून एकास तीन जणांनी बेदम मारहाण करून जखमी केल़े त्यात कु:हाड व काठीचाही वापर करण्यात आला़ याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े निकम नारायण मालचे (वय 40, रा़ चितोड) असे जखमीचे नाव आह़े तू माङयाकडे का पाहतो, असे बोलून रावसाहेब चुडामण पाटील, लक्ष्मण भाईदास पाटील, नरेश भगवान मोरे (तिघे रा़ चितोड) यांनी निकम यांना शिवीगाळ करून काठीने व कु:हाडीसारख्या हत्याराने डोळ्याच्यावर मारून जखमी केल़े तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली़ ही घटना 29 मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास संगमा चौकात घडली़ याप्रकरणी निकम मालचे यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध भादंवि कलम 326, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आह़े
वरखेडीत तरुणाला मारहाण
मागील भानगडीची कुरापत काढून गुलाब शत्रुघA भिल (वय 30, रा़ वरखेडी, ता़धुळे) या तरुणाला विलास विनायक भिल याने लाकडी दांडक्याने डोक्यावर मारून जखमी केल़े तसेच देवकाबाई विनायक भिल, सुनंदाबाई हिलाल बागुल (तिघे रा़ वरखेडी) या दोघींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली़ ही घटना 28 मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मरीमाता मंदिरासमोर घडली़ तशी फिर्याद गुलाब भिल याने धुळे तालुका पोलिसात दिली आह़े त्यावरून तिघांविरुद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े