ग्रामस्थांच्या हल्ल्यात चार पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:56 AM2018-06-19T04:56:52+5:302018-06-19T04:56:52+5:30

दोन महिन्यांच्या बालिकेच्या संगोपनाविषयी बैठक सुरू असताना त्यात वाद होऊन हाणामारी झाली.

Four policemen injured in village attack | ग्रामस्थांच्या हल्ल्यात चार पोलीस जखमी

ग्रामस्थांच्या हल्ल्यात चार पोलीस जखमी

Next

शिरपूर (जि. धुळे) : दोन महिन्यांच्या बालिकेच्या संगोपनाविषयी बैठक सुरू असताना त्यात वाद होऊन हाणामारी झाली. त्याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर ग्रामस्थांनी हल्ला केला. यात सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना दुरबळ्या ता. शिरपूर येथे सोमवारी दुपारी घडली.
दूरबळ्या येथील जगदीश राजाराम पावरा (२२) याने बटवापाडा शिवारात त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती़ त्याला दोन महिन्याची मुलगी आहे. तिचे संगोपन कुणी करावे, याबाबत ही बैठक होती. त्यात वाद होऊन हाणामारी झाली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस दुरबळ्या येथे गेले होते. गावात पोलिसांचे वाहन दिसताच ग्रामस्थांनी त्यावर हल्ला केला़
दगडफेक करीत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली़ त्यात सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस कर्मचारी शाम वळवी, संजय नगराळे, अनंत पवार, यमुना परदेशी हे कर्मचारी जखमी झाले़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Four policemen injured in village attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.