चार ठिकाणी तूर खरेदी केंद्र!
By Admin | Published: February 27, 2017 12:55 AM2017-02-27T00:55:02+5:302017-02-27T00:55:02+5:30
नाफेड : धुळे, शिरपूर, नंदुरबार, शहादा येथील केंद्रांचा समावेश
धुळे : धुळे आणि नंदुरबार जिल्हा मिळून चार ठिकाणी शेतकºयांसाठी तूर खरेदी केंद्र नाफेडच्या वतीने सुरू करण्यात आली आहेत़ शेतकºयांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी कारभारी शिंदे यांनी शेतकºयांना केलेले आहे़ दरम्यान, ही खरेदी केंद्र १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत़
केंद्र शासनाच्या भाव स्थिरता योजनेंतर्गत आधारभूत दराने तूर खरेदी केंद्र नाफेडच्या वतीने धुळे शहर, शिरपूर, नंदुरबार आणि शहादा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे़ या खरेदी केंद्रावर रविवारपर्यंत २४३३१़८२ क्विंटल तूर १ हजार ६७० शेतकºयांकडून खरेदी करण्यात आलेली आहे़
केंद्र शासनाने तूर खरेदीकरिता ९० दिवसांचा कालावधी निश्चित केलेला असून जिल्ह्यात तुरीची खरेदी १५ मार्च २०१७ पर्यंत सुरू राहणार आहे़ तूर खरेदीच्या अनुषंगाने राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनात बैठक पार पडली होती़ बैठकीमध्ये नाफेड, भारतीय अन्न महामंडळ, वखार महामंडळ या विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते़
बैठकीत, राज्यामध्ये या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तुरीचे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झाल्याने तूर खरेदीत वाढ होत आहे़ त्यामुळे तूर खरेदीकरिता आवश्यक असणारे बारदान तसेच साठवणुकीसाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहे़
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात चार ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू असून जिल्ह्यासह अन्य तालुक्यातील शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नजिकच्या खरेदी केंद्रावर आणावी़ एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असेही आवाहन शिंदे यांनी केले आहे़
या ठिकाणी होणार खरेदी
वखार महामंडळ गोदाम, बाजार समिती आवार धुळे़
वखार महामंडळ गोदाम, बाजार समिती आवार शिरपूऱ
कृषी उत्पन्न बाजार समिती आवार नंदुरबाऱ
वखार महामंडळ गोदाम, बाजार समिती, शहादा़