बनावट कंपनीच्या माध्यमातून फसवणूक
By admin | Published: February 5, 2017 12:21 AM2017-02-05T00:21:44+5:302017-02-05T00:21:44+5:30
आऱडी़, एफ़डी.च्या नावे आमिष दाखवून पैसे घेतल्यानंतर ते परत न करता नागरिकांची 9 लाख 75 हजार 300 रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े
धुळे : बनावट कंपनी तयार करून वेगवेगळे प्लॉट पाडून त्या माध्यमातून आऱडी़, एफ़डी.च्या नावे आमिष दाखवून पैसे घेतल्यानंतर ते परत न करता नागरिकांची 9 लाख 75 हजार 300 रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने कंपनीसह नऊ जणांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
याबाबत हरिश्चंद्र खंडू बडगुजर (वय 55, रा़ नारायण मास्तर चाळ, चित्ताेड रोड, धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार सुमित भारती याने भारतीयाज ट्रेड अॅन्ड सव्र्हिसेस प्रा़ लि. या कंपनीची स्थापना करून त्यात इतर स्वत:सह आठ जणांना संचालक, फिल्ड ऑफिसर व एजंट बनविल़े तसेच भारतीयाज ट्रेड अॅन्ड सव्र्हिसेसच्या नावे वेगवेगळे प्लॉट तयार केल़े ते हरिश्चंद्र बडगुजर यांच्यासह त्यांची मुले व नातेवाइकांना आऱडी, एफ़डी.चे नावे आमिष दाखवून 9 लाख 75 हजार 300 रुपये जमा केल़े त्यानंतर जमा केलेले हे पैसे परत न करता कंपनीसह नऊ जणांनी विश्वासघात, सामाईक कटकारस्थान करून बनावट कंपनी तयार करून आर्थिक फसवणूक केली़ हा प्रकार 1 फेब्रुवारी 2011 ते 10 जानेवारी 2016 दरम्यान शहरातील ऐंशी फुटी रस्त्यावरील श्री व्यंकटेश प्लाझा येथे घडला़ याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने भारतीयाज ट्रेड अॅन्ड सव्र्हिसेस प्रा़ लि,बारापत्थर, गोल बिल्डिंग, धुळे, चेअरमन सुमित अमित भारती, चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर अफरोज अमित भारती (रा़ प्लॉट नं 665, आसर नगर, सूर्यमंदिरजवळ), डायरेक्टर नसीर अरिमखान पठाण (रा़ वडजाई रोड, हजर अबुबखरच्या मशिदीच्या पाठीमागे), चंद्रप्रकाश पाटील (रा़ मोगलाई), जाकीर रमजान शेख (रा़ 18 टी हजारखोली, चाळीसगाव रोड), अशपाक शेख (रा़ अलहेरा हायस्कूलजवळ), हेमंत रामदास पाटील (रा़ प्लॉट नं 84, कुणाल सोसायटी, साक्री रोड) व फिल्ड ऑफिसर कुमुदिनी साबळे (रा़ सिध्दार्थनगर, चित्ताेड रोड) यांच्याविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 409, 420, 468, 471, 120 ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े