कोविडच्या कामांतून श्क्षिकांना मुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 10:28 PM2020-08-25T22:28:36+5:302020-08-25T22:29:00+5:30
राज्य शिक्षक परिषद : शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
धुळे : कोविड - १९ च्या कामातून शहरासह जिल्ह्यातील शिक्षकांना मुक्त करण्यात यावे अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली़ दरम्यान, यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे़
निवेदनात नमूद करण्यात आले आहे, धुळे जिल्ह्यातील बऱ्याच शिक्षकांना कोविड १९ च्या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे़ त्यामुळे आॅनलाईन शिक्षण प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असल्याने शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त केले आहे़ शासनाच्या १७ आॅगस्ट २०२० च्या परिपत्रकात तसे आदेशित करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील बºयाच शिक्षकांना ही जबाबदारी देण्यात आली आहे़ ज्या शिक्षकांना ही जबाबदारी दिली आहे त्या कामांतून शिक्षकांना मुक्त करण्यात यावे अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेच्या महानगर शाखेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ यावेळी महेश मुळे, ए़ एस़ शिंदे, के़ बी़ भदाणे, आऱ बी़ सूर्यवंशी, सी़ व्ही़ तोरवणे, ए़ झेड़ सैंदाणे, आऱ डी़ पाठक, जी़ एच़ पाटील, पी़ आऱ शिंगाणे, के़ ए़ पाटील, एम़ डी़ चौधरी, सुनील पाटील, सुभाष बोरसे, आऱ जी़ मोरे आदी उपस्थित होते़