शुक्रवारी १५९ अहवाल पॉझिटिव्ह, पाच रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 07:02 PM2020-08-28T19:02:52+5:302020-08-28T20:56:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी १५९ अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, धुळे ...
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील आणखी १५९ अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये, धुळे शहर, तालुक्यातील वडणे, शिंदखेडा तालुक्यातील विरदेल , चिमठाणे व शिरपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
शुक्रवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ६६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील २०, शिंदखेडा तालुक्यातील ५३, शिरपूर तालुक्यातील १२ व साक्री तालुक्यातील आठ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ९८१इतकी झाली आहे.