शुक्रवारी स्वत: चौपाटीवर बसणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2017 12:58 AM2017-03-09T00:58:50+5:302017-03-09T00:58:50+5:30

अनिल गोटेंचा पुनरुच्चार : चौपाटीवरील स्टॉलधारकांसह पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Friday will sit on the chapatti! | शुक्रवारी स्वत: चौपाटीवर बसणार!

शुक्रवारी स्वत: चौपाटीवर बसणार!

Next


धुळे : शहरातील पांझरा चौपाटीवर शुक्रवार १० रोजी प्रशासनाकडून स्टॉलधारकांवर कारवाई केली जाणार आहे़ शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून आपण चौपाटीवर ठाण मांडून बसणार असून चौपाटी पाडण्यासाठी येणाºयांचे स्वागत करणार असल्याचा पुनरुच्चार आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे केला आहे़ तर दुसरीकडे चौपाटीवरील स्टॉलधारकांसह पत्रकार संघाने बुधवारी पोलीस अधीक्षकांना वेगवेगळी निवेदने सादर केली़
आमदार गोटेंचे पत्रक
चौपाटीला काही लोक विरोध करीत असून त्यांना चांगलं काम अस्वस्थ करतं़  त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करणेच योग्य असल्याचे स्पष्ट करीत १० तारखेला सकाळी १० वाजेपासून चौपाटीवर ठाण मांडून बसणार असल्याचे आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे़
चौपाटी स्टॉलधारकांचे निवेदन!
पांझरा चौपाटी पाडण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना व पत्रकार योगेंद्र जुनागडे प्रयत्नशील आहेत़ जुनागडे हे राष्ट्रवादी-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून स्वत:वर हल्ला करून घेऊन आमदार अनिल गोटे, त्यांचे कार्यकर्ते व स्टॉलधारकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे, असे निवेदन पांझरा चौपाटी खाद्य-पेय विक्रेता सेवा सहकारी संस्थेतर्फे पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले़
त्यामुळे असा प्रकार घडल्यास शहानिशा करूनच कारवाई करावी, असे निवेदनात नमूद आहे़  तरी योगेंद्र जुनागडे यांना २४ तास कॅमेºयासह पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी पांझरा चौपाटी खाद्य-पेय विक्रेता सेवा सहकारी संस्थेतर्फे पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली़ या वेळी मनोज आवळकंठे, नीलेश भडागे, दीपक बडगुजर, महेश चौधरी, योगेश चौधरी, मनोहर चौधरी, सुधीर शिंपी, पिंटू बडगुजर, आप्पा बडगुजर, सुजित बडगुजर, भटू शहा, सलीम शहा, जावेद शहा उपस्थित होते़
पत्रकार संघातर्फे निवेदन!
पांझरा नदी किनाºयावर असणाºया पांझरा चौपाटीधारकांचा मोर्चा ७ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला असता निवेदनातून टीकास्त्र सोडण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर योगेंद्र जुनागडे यांना पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फेही पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली़
गेल्या पाच वर्षांपासून आपण पांझराकाठी २० कोटी रुपयांच्या शासकीय जागेतील व्यापारी स्टॉलचे महाअतिक्रमण उघडकीस आणले आहे़ सदरचे अतिक्रमण काढण्याचे आदेश मनपा व तहसीलदारांचे आहेत़ सदर अतिक्रमण काढावे यासाठी पाठपुरावा केल्याने गैर अर्जदाराकडून आपल्या घरावर तीन वेळा हल्ला व हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत़ गैर अर्जदार यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत़
आता प्रशासन व्यापारी स्टॉलचे अतिक्रमण काढणार असल्याने शासकीय संरक्षण पुरविण्यात यावे, असे पत्र योगेंद्र जुनागडे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले असून मराठी पत्रकार संघातर्फे देखील जुनागडे यांना संरक्षण देण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे त्या पत्रातून करण्यात आली आहे.  या वेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत मदाने, प्रकाश चव्हाण, एम़जे़ मकासरे, गो़पी़लांडगे, रूपेश मराठे, आशुतोष जोशी, वाहिद काकर, निखिल जुनागडे, पंकज पाटील, डी़बी़पाटील, अतुल पाटील, मनोज गर्दे, रमेश दाणे, यशवंत हरणे, नरेंद्र सोनवणे, राजेंद्र गुजराथी, दिनेश रावल, आदेश कुलकर्णी, नीलेश बाविस्कर, प्रशांत परदेशी आदी पत्रकार उपस्थित होते़

Web Title: Friday will sit on the chapatti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.