सुख-दु:खात नाते जपण्याची भावना म्हणजे मैत्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 10:41 PM2017-08-05T22:41:11+5:302017-08-05T22:41:48+5:30
जागतिक मैत्री दिवस : जवान चंदू चव्हाण व जिम्नॅस्ट योगेश्वरी मिस्तरीची भावना जागतिक मैत्री दिवस : जवान चंदू चव्हाण व जिम्नॅस्ट योगेश्वरी मिस्तरीची भावना
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : ‘फे्रंडशिप डे’ अर्थात मैत्रीदिन एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो, याचा आनंद आहे़ परंतु केवळ एकमेकांच्या हाताला ‘बेल्ट’ बांधण्यापुरता तो मर्यादित असू नये़ एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याची भावना म्हणजेच खरी मैत्री, असे मत शूर जवान चंदू चव्हाण, सुप्रसिध्द जिम्नॅस्ट योगेश्वरी मिस्तरी यांनी व्यक्त केले़
मैत्रीची जोपासना महत्त्वाची!
आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टिकच्या माध्यमातून ठसा उमटविणारी धुळयाची कन्या योगेश्वरी मिस्तरीने मैत्री दिनानिमित्त ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या़ अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा योग आल्याने अनेक मित्र-मैत्रीणी मिळाले आहेत़ त्यांना शुभेच्छा देऊन मैत्रीदिन साजरा करीत असल्याचे तिने सांगितले़ पण केवळ मैत्रीदिनाला हाताला ‘बेल्ट’ बांधल्याने मैत्रीची जोपासना होत नाही, तर वर्षभर मित्र मैत्रिणींच्या सुख-दु:खात सहभागी व्हायला हवे, याच खºया मैत्रीदिनाच्या शुभेच्छा ठरतात, असे योगेश्वरी म्हणाली़