बोराडीच्या आदिवासी संतप्त मुलींचा भर उन्हात पायी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 05:04 PM2018-03-27T17:04:49+5:302018-03-27T17:04:49+5:30
शिरपूर : शासकीय आदिवासी वसतिगृहातील समस्या, तहसिलदारांना भेटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील मुलींच्या समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त ४०-५० तरूणींनी भर उन्ह्यात पायी येवून तहसिलदारांना निवेदन दिले़
मंगळवारी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास वसतीगृहातील मुलींच्या समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात होते़ त्यामुळे संतप्त ४०-५० मुलींनी विविध मागण्यांसाठी शिरपूर येथे येण्यासाठी पायी मोर्चा काढला़ उन्ह्याची तमा न बाळगता डोक्यावर स्कार्प व रूमाल टाकून त्या पायी निघाल्या़
गृहपाल महिला येतच नाही
बोराडी येथील शासकीय वसतीगृहातील संबंधित गृहपाल महिला गेल्या ३ महिन्यात फक्त २ दिवस आली़ मुलींना निर्वाह भत्ता सुध्दा नियमित मिळत नाही़ बहुतांशी मुलींना सहा-सहा महिने होवून जातात तरी निर्वाह भत्ता दिला जात नाही़ मुलींच्या समस्या सोडवायला गृहपाल महिला नसल्यामुळे हाल होत आहेत़ वसतीगृहातील संबंधित लिपिक महिलेला समस्या सांगून त्या गृहपाल यांच्याकडे जातात तेव्हा सुध्दा त्यांना आरेरावीची भाषा वापरली जाते़ कायम स्वरूपी गृहपाल हवा आहे़ अनेकदा वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी करून सुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले जाते़
अधिकाºयांना झटकारले़़़
अखेर समस्यांना कंटाळून वसतीगृहातील मुलींनी पायी मोर्चा काढला़ दरम्यान, सदरचे वृत्त शिरपूर येथील आदिवासी वसतीगृहाचे शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप ईशी व के़एम़सनेर यांना कळताच त्यांनी मार्गावरील वाडी गावाजवळ मुलींना भेटून समस्या पूर्ण सोडविण्याचे आश्वासन देवून सुध्दा संतप्त मुलींनी त्याकडे दुर्लक्ष करून त्या मार्गस्थ झाल्यात़
३ मुलींची तब्बेत बिघडली़़़
पायी मोर्च्यात सहभागी झालेल्या वसतीगृहातील सरीता कोमा पावरा, मिनल विक्रम पावरा व मनिषा जगदिश पावरा यांची तीव्र उन्ह्यामुळे तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, यापुर्वीही विद्यार्थिनीनी आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते़