आमदारांच्या घरासमोर दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:40 PM2019-12-30T22:40:47+5:302019-12-30T22:41:21+5:30

भोलेबाबा नगर : क्षुल्लक कारणाचे पडसाद

In front of the MLA's house, in two groups | आमदारांच्या घरासमोर दोन गटात हाणामारी

आमदारांच्या घरासमोर दोन गटात हाणामारी

Next

धुळे : एकमेकांकडे बघण्याच्या क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना वडजाई रोडवरील भोलेबाबा नगरात आमदार डॉ़ फारुख शहा यांच्या घरासमोर शनिवारी दुपारी घडली़ यात गुप्ती, लाठ्या-काठ्या आणि लोखंडी पाईपाचा सर्रासपणे वापर झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ यात मजुरी काम करणाऱ्या तरुणाला दुखापत झाली़ ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़
एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन सुरुवातीला शिवीगाळ करण्यात आली़ यानंतर याचे पडसाद दोन गटात हाणामारीत उमटले़ ही घटना वडजाई रोडवरील भोलेबाबा नगरात आमदार डॉ़ फारुख शहा यांच्या घरासमोर शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली़ गुप्ती, लाठ्या-काठ्या आणि लोखंडी पाईपाचा सर्रासपणे वापर झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता़ या हाणामारीत तारीक मोहम्मद हानिफ (२८, रा़ इशाक मशिदजवळ, धुळे) या मजुरीचे काम करणाºया तरुणाला डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात धावपळ उडाली होती़ घटनेनंतर तातडीने जखमी झालेल्या तरुणाला भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले़
प्राथमिक उपचार घेतल्यानंतर जखमी झालेल्या या हाणामारीत तारीक मोहम्मद हानिफ याने आझादनगर पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित बबलू हंसा अन्सारी, रईस हंसा अन्सारी, शाबीर भोलू शहा, शरिफ शहा (पूर्ण नाव माहित नाही), सलमान शहा (पूर्ण नाव माहित नाही) या पाच संशयितांविरुध्द भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक एऩ एम़ सहारे घटनेचा तपास करीत आहेत़ अद्याप कोणालाही अटक केलेली नाही़

Web Title: In front of the MLA's house, in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे