धुळ्यात फळ विक्रेत्यांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 11:37 AM2019-10-16T11:37:08+5:302019-10-16T11:38:22+5:30

दोन्ही गटातील आठ जणांवर गुन्हा दाखल

Fruity fruit vendors in the mist | धुळ्यात फळ विक्रेत्यांमध्ये हाणामारी

धुळ्यात फळ विक्रेत्यांमध्ये हाणामारी

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत
धुळे : फळे कमी भावाने विकण्यासह रस्त्यात गाडी लावण्याच्या कारणावरून शहरातील अकबर चौकात दोन फळ विक्रेत्यांमध्ये सुरवातीला वाद होऊन त्याचे पर्यवसन हाणामारी झाले. याप्रकरणी दोन्ही गटातर्फे परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली असून, आठ संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी शरीफ शेख अकबर (४५, रा. लाला सरदार नगर, धुळे) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १२ रोजी सायंकाळी फळे कमी दराने विकण्याच्या कारणावरून शकील बागवान, अकील बागवान, नईम बागवान, इजाज बागवान यांनी वाद घालून चौघांनी लोखंडी पाईप व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावरून चौघांविरूद्ध धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
तर हाजी इजाज बागवान (वय ३९ रा. मुल्लावाडा, गल्ली नं. २) याने परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, रस्त्यात फळाची गाडी का लावली यावरून शरीफ पठाण, खालीद पठाण, जमील पठाण, नवाज पठाण यांनी वाद घालून पाईपने तसेच हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळही केली.
याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Fruity fruit vendors in the mist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे