शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी निधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:23 PM2019-03-10T12:23:27+5:302019-03-10T12:24:15+5:30

औदार्य : शिरपूर तालुका आरोग्य कर्मचा-यांचा पुढाकार 

Fund for martyrs' families | शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी निधी 

शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी निधी 

Next

लोकमत आॅनलाईन 
शिरपूर : जम्मु-काश्मिरजवळील पुलवामा येथे दहशतवादी आत्मघाती हल्ल्यात सिमा सुरक्षा दलाचे ४० जवान शहिद झाले होते़ त्या कुटुंबांना आपल्यापरीने काहीतरी आर्थिक निधी त्यांना मिळावा म्हणून येथील आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांकडून १५ हजार ५५५ रूपयांचा निधी सैनिक कल्याण कार्यालयात जमा करण्यात आला़
पुलवामा हल्ल्यानंतर तालुका आरोग्य कार्यालयातील कर्मचारी अनिल मराठे, छोटू शिरसाठ व पंकज मराठे असे तिघांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील कर्मचा-यांना भेटून शहिद जवानांना मदतीसाठी सोशल मिडीयाद्वारे आवाहन करण्यात आले होते़ त्यानंतर अवघ्या काही दिवसातच निधी गोळा करण्यात आला़ 
त्यानंतर धुळे येथील सैनिक कल्याण कार्यालयातील अधीक्षक पाटील यांच्याकडे रोख १५ हजार ५५५ रूपयाचा निधी शहीद जवान कुटुंबीयांसाठी सुपूर्द करण्यात आला. 

Web Title: Fund for martyrs' families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे