अवैध वाळू उत्खननावर गाजली ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 09:53 PM2018-11-29T21:53:44+5:302018-11-29T21:54:30+5:30

चिमठाणे ग्रामसभा : वाळू माफियांवर एमपीडीए अंतर्गत कारवाईची मागणी; पाणीटंचाईवर देखील चर्चा

Gajali Gram Sabha on illegal sand excavation | अवैध वाळू उत्खननावर गाजली ग्रामसभा

अवैध वाळू उत्खननावर गाजली ग्रामसभा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : चिमठाणेसह ग्रुप ग्रामपंचायतीत अंतर्गत येणाºया दलवाडे व पिंप्री येथील बुराई नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करण्यासाठी व उत्खनन झालेल्या वाळू खड्ड्यांचे मोजमाप करण्यात येवून एमपीडीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी गेल्या सोमवारी सकाळी अकरा वाजता सरपंच खंडू भिल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. 
तिनही गावातील शेकडो तरूणांनी मोठी गर्दी केली होती. सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. लगेच ठरावाच्या प्रती जिल्हाधिकरी राहूल रेखावार व तहसीलदार सुदाम महाजन यांना देण्यात आले. यावेळी पाणी टंचाईवरही चर्चा करण्यात आली.   चिमठाणेसह दलवाडे (प्र.सोनगीर) व पिंप्री येथील बुराई नदीपात्रातून बºयाच वर्षांपासून दिवस-रात्र वाळूचे अवैध उत्खनन व अवैध वाहतूक करण्यात येत होती. १७ नोव्हेंबर रोजी रात्री पिंप्री व चिमठाणे येथील तरूणांनी पिंप्री शिवारातील बुराई नदीपात्रातून जेसीबीने दोन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरतांना रंगे हात पकडून दिले. पण जेसीबी व एक ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले होते. येथील दूरक्षेत्राचे सहाय्यक निरिक्षक रमेश चव्हाण यांनी एक ट्रॅक्टर शिंदखेडा पोलिस ठाण्यात जमा केले व बंटी नगराळे यांच्या विरोधात फक्त गुन्हा दाखल करण्यात आला. पण किरण नगराळे व जेसीबी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या वरून तिनही गावातील तरूणांनी व ग्रामस्थांनी ग्रामसभा घेण्यास भाग पाडले. 
तिन्ही गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तिन्ही गावातील घराच्या बांधकामासाठी बैलगाडीने वाहतूक करण्यात येईल. पण घरमालकाने ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा व बैलगाडी मालकांचे लेखी घेण्यात येणार आहे. यावेळी यंदा मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने नळांना तोट्या बसविण्यात याव्यात. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारावरही चर्चा झाली. गोवर- रूबेला लसीकरण मोहीमेबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका लता कुंवर यांनी माहिती दिली. 
ग्रामसभेला अधिकारी व कर्मचाºयांची दांडी!
या विशेष सभेला येथील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना बोलविणात आले होते. पण फक्त येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक लता कुंवर व आरोग्य सेवक चौरे उपस्थित होते. उपस्थित नसलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात याव्यात, अशी मागणी पंचायत समिती सदस्य दरबारसिंह गिरासे यांनी केली. 
वाळू माफियांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी-
चिमठाणेसह दलवाडे व पिंप्री येथील बुराई नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व अवैध वाहतूक करण्याºयांवर नदीपात्रातील वाळू उत्खनन झालेल्या खड्ड्यांचे मोजमाप करून वाळू माफियांवर एमपीडी अंतर्गत कारवाई करावी, असा ठराव करण्यात आला आहे.  यावेळी पंचायत समिती सदस्य दरबारसिंह गिरासे, डॉ.भरतसिंह गिरासे, विरेंद्रसिंह गिरासे, देविदास नगराळे, ग्रामपंचायत सदस्य सुरतसिंह गिरासे, अनंता माळी, महेंद्र्रसिंह गिरासे, नानकदास नगराळे, बाळू महाराज, अशोक माळी, योगेश गिरासे, ग्रामसेवक मेहरे व तरूण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरोध करणाºया तरुणांना दमदाटी
सोमवारी सकाळी अकरा वाजता येथील गाव दरवाजा येथे प्रथमच मंडप टाकून सरपंच खंडू भिल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाची शपथ देण्यात आली. या वेळी तरूणांनी व ग्रामस्थांनी बुराई नदीपात्रातून दिवस-रात्र होणारा अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करण्यात येवून अवैध वाळू उत्खननाचे मोजमाप करून संबंधितांना जबाबदार धरण्यात यावे. वाळू माफियाची ‘दादागिरी’ वाढली आसल्याने जे तरूण वाळू चोरीला विरोध करतात त्यांना दमदाटी केली जात असल्याची तक्रार करण्यात आली.

Web Title: Gajali Gram Sabha on illegal sand excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे