आदर्श शाळा पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:44 PM2019-01-04T22:44:39+5:302019-01-04T22:44:59+5:30
दोंडाईचा हस्ती स्कूल : सोलापूर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेतर्फे या शाळेला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़
सोलापुर येथील हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला़ यावेळी राज्यस्तर आदर्श शाळा पुरस्कार मेस्टाचे अध्यक्ष संजय तावड़े पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या शैलाताई गोडसे यांच्या हस्ते हस्ती स्कूल चेअरमन कैलास जैन, शासकीय अधिकारी हरिकृष्ण निगम, प्राचार्य एस.एन.पाटील, प्रकाश खंडेराय यांनी यांना पुरस्कार देण्यात आला़ या सोहळ्याप्रसंगी सोलापुर जिल्ह्याचे शेतकरी संघटनेच भैय्यासाहेब देशमुख, पठाण, गणेश निळ आदी मान्यवर उपस्थित होते़
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने हस्ती स्कूलला सुरूवात केली होती़ सध्या या शाळेत दोन हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यम शिक्षणाचे धडे घेत आहे़
हस्ती स्कूलच्या माध्यमातुन शिक्षणातच नव्हे तर शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा, विज्ञान, कला, क्रिडा, स्काउट गाइड, चित्रकला या सर्वच क्षेत्रांमध्ये शाळा अग्रेसर असल्याचे मत चेअरमन कैलास जैन यांनी यावेळी व्यक्त केले़ दरम्यान या पुरस्कारामुळे हस्ती स्कूलचे राज्याभरात नाव लौकिक झाला आहे़