दोंडाईचा आगार प्रमुखांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:03 PM2018-12-24T12:03:23+5:302018-12-24T12:03:41+5:30
मागणी : रास्तारोको आंदोलन करण्याचा शिवसैनिकांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील साहुर गाव मोठ्या लोकवस्तीचे आहे, मात्र गावाला परिवहन विभागाची बस येत नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे, बससेवा सुरू करावी, या मागणीसाठी आगार प्रमुखांना शिवसैनिकांनी घेराव घातण्यात आला़
साहुर, झोटवाडे, शेंदवाडे, दाऊळ, मंदाणे, तावखेडा येथील विध्यार्थी, शेतकरी, पालकसह नागरिकांनी साहुर ते दोंडाईचा अप्पर तहसिलदार कार्यालयपर्यंत पायपिट करून बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती़ मात्र प्रशासनाकडून अद्याप दखल घेतलेली नाही़ हस्ती स्कूल, दाऊळमार्गे १५ दिवसात बस सुरू करावी अन्यथा परिसरातील शेतकरी व विध्यार्थी दोंडाईचा मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी दोंडाईचा आगार प्रमुख श्रीमती अ. दा. चौरे यांना दिला आहे़ यावेळी वासुदेव चित्ते, संजय मगरे, राजधर कोळी, कुणाल माळी, किरण सावळे, सागर कोळी, चेतन चौधरी, मंगल कोळी उपस्थित होते़ बससेवा सुरू करण्यासाठी अनेक दिवसांपासुन पाठपुरावा सुरू आहे़ मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोनल तिव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे़