गाव कारभाऱ्यांचा ‘लोकमत’तर्फे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:07 PM2019-02-23T12:07:48+5:302019-02-23T12:09:00+5:30
लोकमत सरपंच अॅवॉर्डसचे थाटात वितरण : धुळ्याच्या सन्मान सोहळ्यात भारावून गेले १३ सरपंच
धुळे : ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणाºया जिल्ह्यातील १३ सरपंचांना शुक्रवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत’ सरपंच अॅवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. शहरातील हिरे भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गावागावांतील विकास कामांची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना बीकेटी टायर्स प्रस्तूत ‘लोकमत’ सरपंच अॅवॉर्ड्सने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर पतंजली हे सहप्रायोजक होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, साक्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार डी.एस. अहिरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., महाराष्टÑ बीकेटीचे अॅग्री सेलचे जुबेर शेख, बीकेटी टायर्सचे वितरक राहुल धूत, बीकेटी डिलर प्रवीण वसवा, ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व ‘लोकमत’ चे धुळे जिल्हाप्रमुख राजेंद्र शर्मा आदी उपस्थित होते.
दुसºया वर्षी केलेल्या आवाहनासही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. यासाठी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाºया सरपंचांनी मोठ्या प्रमाणाहून अधिक प्रस्ताव सादर केले होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वालन करून ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल बाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कारावेळी बीकेटी टायर्सच्या माहितीची चित्रफीतही उपस्थितांना दाखविण्यात आली. सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास जिल्ह्यातील चारही तालुक्यातून सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर ज्यांना पुरस्कार मिळाला नाही, अशा सरपंचांनी विजेत्या सरपंचांचे अभिनंदन करतांना त्यांच्याकडून काम करण्याची पद्धती आणि अन्य गोष्टी जाणून घेतल्यात. तसेच पुढच्यावर्षी आपणही अशापद्धतीने काम करुन पुरस्कारासाठी पुन्हा प्रयत्न करु, असा विश्वास व्यक्त केला. काही ग्रामपंचायतीच्या सदस्यांनीही याबाबत एकमेकाशी चर्चा केली.