धुळ्यात गाव कारभा-यांचा ‘लोकमत’तर्फे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 04:30 PM2018-01-08T16:30:23+5:302018-01-08T16:31:21+5:30

लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्डसचे थाटात वितरण : धुळ्याच्या सन्मान सोहळ्यात भारावून गेले १३ सरपंच

Gaurav by 'Lokmat' of Dhule village | धुळ्यात गाव कारभा-यांचा ‘लोकमत’तर्फे गौरव

धुळ्यात गाव कारभा-यांचा ‘लोकमत’तर्फे गौरव

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ११३ सरपंचांची उपस्थिती. कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक सरपंचांना दिली भेटवस्तू जिल्ह्यातील १३ उत्कृष्ट सरपंचांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणाºया धुळे जिल्ह्यातील १३ सरपंचांना सोमवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत’ सरपंच अ‍ॅवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. शहरातील छत्रपती राजर्षी शाहू  महाराज नाट्यमंदिरातील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
गावागावांतील विकास कामांची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना बीकेटी टायर्स प्रस्तूत ‘लोकमत’ सरपंच अ‍ॅवॉर्ड्स २०१७ ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. पतंजली आयुर्वेद हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक होते. यावेळी राज्याचे रोहयो व पर्यटमंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सवव्यवसाय मंत्री महादेव जानकर, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे,  जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, सामाजिक कार्यकर्त्या इंदिराताई पाटील (विटनेर, ता. चोपडा), बीकेटीचे वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद सप्तकोटेश्वर, साहाय्यक व्यवस्थापक झुबेर शेख, बीकेटी टायर्सचे वितरक राहुल दुत,  महिंद्राचे वितरक जगदीश बागुल, महिंद्राचे टेरीटरी मॅनेजर योगेश लोंढे ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा, ‘लोकमत’चे  निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व ‘लोकमत’ चे धुळे जिल्हा प्रमुख राजेंद्र शर्मा आदी उपस्थित होते.  पहिल्या वर्षी केलेल्या आवाहनाला धुळे जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. यासाठी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाºया सरपंचांनी मोठ्या प्रमाणाहून अधिक प्रस्ताव सादर करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल बाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कारावेळी माहितीची चित्रफीत दाखविण्यात आली. हे पाहून सरपंचांसह उपस्थित भारावून गेले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन वाहीद अली यांनी केले. 

Web Title: Gaurav by 'Lokmat' of Dhule village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.