गौरीची आकर्षक मुखवटे बाजारात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:27 PM2019-09-03T12:27:44+5:302019-09-03T12:28:02+5:30

गौरी उत्सव : कुटुंबातील सदस्य एकवटले, विधीवत पूजा, मुखवट्यांना उजाळा 

Gauri's eye-catching masks are on the market | गौरीची आकर्षक मुखवटे बाजारात दाखल

गौरींच्या मुखवट्यांवरील विविध भावमुद्रा पाहताना महिला. 

googlenewsNext

धुळे : गणरायाच्या स्थापनेनंतर गौरींचे आगमन होत असून गुरूवारी थाटात स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी बाजारात पुजेच्या साहित्यासह मुखवटे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. 
यंदाही श्री महालक्ष्मीचा सन सलग तीन दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे़ या उत्सवाला गुरूवारी स्थापना केली जाणार असल्याने बाजारातुन भक्तांनी  धातूची मूर्ती, मातीची मूर्ती, कागदावरचे चित्र व पाच लहान खडे अथवा मुखवटे खरेदी केले आहेत़ गुरूवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस रात्रभर जागरण करून महिला गौरी उत्सव उत्साहाने साजरा करतात़ यावेळी गौरी व महालक्ष्मीची महती सांगणारी पांरपारिक गीते गायली जातात़ 
असा असतो देवीला नवैद्य
गौरी स्थापनेनंतर देवीसमोर विविध पदार्थ त्यात लाडू, करंजी, शंकरपाळे, खारीक, खोबरे ठेवले जाते़ सकाळी महिलांनी जरीची वस्त्रे परिधान करून गौरीसमोर अखंड नंदादीप ठेवला जातो़ दोन गौरींमध्ये गणपती बाप्पा यांना बसविले जाते. 
सोळा पालेभाज्यांचे महत्व 
 पुजन व भोजनांचा कार्यक्रम आयोजित केला जातो़ यावेळी आरोग्यदायी १६ विविध पालेभाज्यांना विशेष महत्व असते़ गौरीच्या नैवेद्यामध्ये एकूण १६ प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. 
शनिवारी देवीला निरोप
गुरूवारी गौरीस्थापना केली जाणार आहे़ शनिवारी ६ सप्टेंबर रोजी गौरीसमोर विविध पदार्थ ठेवले जातात  त्यात लाडू, करंजी, शंकरपाळे, खारीक, खोबरे यांचा समावेश असतो़  देवीचा महानैवेद्य सकाळी प्रसाद म्हणून घेतात. या दिवशी कानवले  आणि खीर यांचा नैवेद्य दाखवून गौरीला प्रेमाचा निरोप दिला जाणार आहे़   शेवटी घरातील प्रमुख व्यक्ती गौरीचे मुकुट धान्याच्या राशीवर ठेवतात. गौरी उत्सव श्री महालक्ष्मीचा तीन दिवसांचा सण सर्व मिळून एकोप्याने व आनंदाने उत्सव साजरा करण्यात येतो़ 

Web Title: Gauri's eye-catching masks are on the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे