गीता परिवारातर्फे २० मेपर्यंत आॅनलाईन संस्कार वर्गाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 12:13 PM2020-05-07T12:13:57+5:302020-05-07T12:14:15+5:30

ई-संस्कार वाटिका : आध्यात्मानेही धरली आॅनलाईनची कास

Geeta Parivar organizes online rites till May 20 | गीता परिवारातर्फे २० मेपर्यंत आॅनलाईन संस्कार वर्गाचे आयोजन

गीता परिवारातर्फे २० मेपर्यंत आॅनलाईन संस्कार वर्गाचे आयोजन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लॉकडाउनमुळे गीता परिवारातर्फे सहा ते २० मे दरम्यान आॅनलाईन संस्कार वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी दिली़
आॅनलाईन वर्गांच्या माध्यमातून बालकांच्या शारिरीक आणि मानसिक विकासाला घरबसल्या चालना देण्याचे काम केले जाणार आहे़ प़ पू़ आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या प्रेरणेने आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ़ संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजकांनी आॅनलाईन वर्ग चालविण्याचा निर्णय घेतला आहे़
गिता परिवाराच्या संस्कार वर्गात ज्ञान, विज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असणार आहे़ संस्कार, कथा, शिवतांडव स्त्रोत संस्था, योगासने, परिवार संवाद, जिज्ञासा, समाधान, संत संदेश, मनोरंजन व प्रश्नोत्तरी असे या ई-संस्कार वाटिकेचे स्वरुप असेल़
विनाशुल्क असलेला हा उपक्रम सहा मे ते २० मे दरम्यान हा आॅनलाईन संस्कार वर्ग होईल़ आठ ते पंधरा वर्षे वयोगटातील मुले यात भाग घेवू शकतील़ सहभागी मुलांचे व्हाटस्अप ग्रुप तयार करुन ई-संस्कार वर्गाचे व्हीडीओ ग्रुपवर रोज पाठविले जातील़ साधारण एक तासाचा हा व्हीडीओ सोयीनुसार मोबाईल किंवा संगणकावर मुलांना पाहता येईल़ या वर्गात सहभागी होण्यासाठी आॅनलाईन लिंग पाठवली जाणार आहे़ जगभरात नावनोंदणी सुरू आहे़
नाव नोंदणीसाठी संजय मुंदडा, रेखा मुंदडा, मनिषा मुंदडा, उषा काबरा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे़
जगभरात नोंदणी
४गीता परिवाराचे हे आॅनलाईन संस्कार वर्ग जगभरात आहेत़ दुबई, कतार, फ्रान्स, सिंगापूर, अमेरिका, आॅस्ट्रेलीया, नेदरलँड, न्यूजर्सी, मस्तक, अबुधाबी, ढाका, जकार्ता, डेन्मार्क, लंडन, टेक्सास, नायजेरिया या देशांमध्ये आतापर्यंत २५ हजार बालकांनी नोंदणी केली आहे़

Web Title: Geeta Parivar organizes online rites till May 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे