नुकसान भरपाई मिळवून द्या-सुभाष भामरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:02 AM2019-06-14T10:02:24+5:302019-06-14T10:03:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : वादळी वाºयामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नुकसानीचे पंचनामे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वादळी वाºयामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करुन त्यांना योग्य ती भरपाई मिळवून द्यावी या आशयाचे निवेदन खासदार डॉ़ सुभाष भामरे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना सादर केले़
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, प्रा़ अरविंद जाधव, सुनील सोनार, संजय पाटील, किशोर सिंघवी, देवेंद्र पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते़ मंगळवारी झालेल्या वादळामुळे धुळे तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये विजेचा पुरवठा खंडीत आहे़ वार, हरण्यामाळ, रावेर, फागणे, नांद्रे, सौंदाणे, लळींग, जुन्नेर, बोरकुंड आणि पाडळदे या गावांमधील काही घरांचे पत्रे उडाली आहेत़ शिरुड, वेल्हाणे येथे शेतकºयांनी उभारलेले पॉली हाऊस कोसळले आहे़ बºयाच गावांमध्ये शेडनेट हाऊसचे नुकसान झाले़ गुरे मृत्युमुखी पडली़ कांदा पिकाची हानी झाली़ एमआयडीसी येथील नुकसानीची माहिती शासनाला कळवावी़ दुष्काळाचा सामना करणाºया शेतकºयांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़
सभापती-नगरसेवकात शाब्दिक चकमक
खासदार डॉ़ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी दाखल झाले़ पदाधिकाºयांना घेऊन वाहने निघाली़ यात बाळापूरचे नगरसेवक संजय पाटील यांना वाहनात जागा नसल्याचे कारण सांगून दुर्लक्षित केल्यामुळे संतप्त झालेले नगरसेवक पाटील आणि स्थायी समिती सभापती युवराज पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली़ हा वाद चांगलाच रंगल्याने हा विषय चर्चेचा ठरला़