शेतकरी संपास पाठिंब्यासाठी ‘घंटानाद’
By Admin | Published: June 2, 2017 01:14 PM2017-06-02T13:14:40+5:302017-06-02T13:14:40+5:30
शिवसेना व विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन व निदर्शने करण्यात येत आहेत.
ऑनलाईन लोकमत
धुळे ,दि.2- शेतक:यांनी कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या आंदोलनास पा¨ठंबा देण्यासाठी शुक्रवारी शिवसेना व विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन व निदर्शने करण्यात येत आहेत.
1 जूनपासून शेतकरी संपावर गेल्याने दूध, भाजीपाला, कांद्यासह अन्नधान्याची नासाडी होत आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आपल्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठीच शेतक:याने कधी नव्हे ते संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे 1 ते 7 जून या दरम्यान शेतकरी आपला माल कोठेही विकणार नाहीत. शेतक:यांनी मुंबई, पुणे या सारख्या मोठय़ा शहरांना होणारा दूध, भाजीपाल्याचा पुरवठा बंद केला आहे. शेतक:यांच्या मूलभूत प्रश्नांवर सरकारने तोडगा काढून कर्ज माफ केले पाहिजे, दूध, भाजीपाल्याचे दर वाढले पाहिजे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजे, या मागण्यांसाठी शेतकरी पेटून उठला आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे हे सगळ्यांचे कर्तव्य असल्याने शिवसेना आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदे टाकून घोषणा दिल्या.