डॉक्टरांच्या सुरिक्षतेसाठी शिवसेनेकडून पीपीई किटची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 09:41 PM2020-05-06T21:41:55+5:302020-05-06T21:42:49+5:30

जिल्हा सर्वोपचार रूग्णालय : उपक्रमाचे कौतूक

 Gift of PPE kit from Shiv Sena for the safety of doctors | डॉक्टरांच्या सुरिक्षतेसाठी शिवसेनेकडून पीपीई किटची भेट

dhule

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे़ या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा करणाऱ्या डॉक्टरांची देखील काळजी घेण्यासाठी शिवसेना महानगरातर्फे सर्वोपचार रूग्णालयास ५० पीपीई किट भेट देण्यात आली़
राज्यासह देशभरात कोरोना विषाणू आजाराने थैमान घातले आहे़ राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव शहरानंतर धुळे शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्येत वाढ होत आहे़ धुळे, नंदूरबार, जळगाव, अमळनेर, पारोळा तसेच चाळीसगाव तालुक्यतील कोरोना सदृश्य आजाराचे रूग्ण प्राथमिक चाचणीसाठी धुळ्यातील सर्वोपचार रूग्णालयात दाखल होतात़ त्यामुळे या रूग्णालयात मोठ्या प्रमाणात ताण पडतो़ कोव्हीड १९ साठी स्वतंत्र कत्र व्यतिरिक्त या सर्वोपचार रूग्णालयात इतर १३ विभाग कार्यरत आहेत़ सर्वात जास्त रूग्ण स्त्रीरोग विभागात दररोज येतात़ साधारण दररोज ५० पेक्षा अधिक गरोदर माता प्रसृती होतात़ ही बाब लक्षात घेऊन आमदार चंद्रकांत रघूवंशी यांच्या माध्यमातून स्त्री रोग विभागास नवजात शिशु, गर्भवती व प्रसुतीजन्य मातांच्या सुरक्षितेसाठी ५० पीपीई कीट भेट देण्यात आली़ यावेळी अधिष्ठाता डॉ़नागसेन रामराजे, डॉ़ राजकुमार सुर्यवंशी,डॉ़अरूण मोरे, शिवसेना संपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख संजय गुजराथी, धिरज पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते़

Web Title:  Gift of PPE kit from Shiv Sena for the safety of doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे