धुळ्यात नराधम बापाविरुध्द मुलीने नोंदविली फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 04:48 PM2018-05-24T16:48:19+5:302018-05-24T16:48:19+5:30

शांतीनगरातील घटना : अवघ्या पाऊण तासात नराधम गजाआड

The girl lodged in Dhule against the girl | धुळ्यात नराधम बापाविरुध्द मुलीने नोंदविली फिर्याद

धुळ्यात नराधम बापाविरुध्द मुलीने नोंदविली फिर्याद

Next
ठळक मुद्देबुधवारी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आलापोलिसांनी तपासाची चक्रे फिरविलीनराधम भालचंद्र बोरसे याला अवघ्या पाऊण तासात अटक केली 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : स्वत:च्या पोटच्या मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहरातील शांतीनगरात मंगळवारी दुपारी घडली़ याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने आझादनगर पोलीस स्टेशनला धाव घेतल्यानंतर ही बाब उजेडात आली़ गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित भालचंद्र भगवान बोरसे (४५, शांतीनगर, अभय कॉलेजजवळ, धुळे) या नराधम बापाला पोलिसांनी गजाआड केले़ 
शहरातील अभय कॉलेजजवळ असलेल्या शांती नगरात भालचंद्र बोरसे हे आपल्या परिवारासोबत प्लॉट नंबर ४ मध्ये वास्तव्यास आहे़ त्यांची पत्नी कुठे बाहेर गेलेली असताना त्यांची १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती़ मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तिच्या एकटेपणाचा फायदा कुण्या दुसºयाने न उचलता तिच्या बापानेच उचलला़ बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि ही बाब कोणालाही सांगितली तर तुझ्या आईला जिवे ठार मारुन टाकण्यात येईल़ अशी धमकी दिल्यामुळे ही मुलगी भेदरली़ थोड्यावेळाने तिची आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने आपबिती सांगत वडीलांनी केलेला पराक्रम सांगितला़ 
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलगी, तिची आई आणि मामा हे आझादनगर पोलीस स्टेशनला आले़ पीडिताने तिच्या बापाविरोधात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता फिर्याद नोंदविली़ त्यानुसार नराधम भालचंद्र भगवान बोरसे याच्या विरोधात भादंवि कलम ३७६ (२), (फ) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण, अधिनियम २०१२ चे कलम ६ प्रमाणे आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एच़ एऩ उगले करीत आहेत़ 

Web Title: The girl lodged in Dhule against the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.