टक्केवारीत मुलीच ठरल्या पुन्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 08:02 PM2020-08-01T20:02:14+5:302020-08-01T20:06:07+5:30
अनेक शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के : गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव, पुढील प्रवेशाचे नियोजन सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल बुधवारी जाहीर झाला. यात जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मुलींनीच गुणानुक्रमे बाजी मारल्याचे स्पष्ट झालेले आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
धुळे
कमलाबाई कन्या शाळा
स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई कन्या शाळेचा निकाल ९७.९५ टक्के लागला.शाळेतील ५३९ पैकी ५२८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. यात प्रथम स्रेहा मोहन मेखे (९८.२०), द्वितीय विभागून वैष्णवी विवेक अमृतकर व अजंली नंदकिशोर गवळ (९७), तृतीय प्राची प्रसाद विंचुरकर (९६.४०). यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी, उपाध्यक्षा सुहासिनी देशपांडे, उपाध्यक्ष नंदलाल रूणवाल, सचिव शिल्पा म्हस्कर, सुलभा भानगावकर, खजिनदार के.यू. नाबरिया, मुख्याध्यापिका मनीषा जोशी यांनी कौतुक केले आहे.
परिवर्तन विद्यालय
मिल परिसरातील परिवर्तन माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. यात प्रथम दिशा नितीन नेमाने (८७.८०), द्वितीय चैतन्य संजय भावसार (८६.२०),तृतीय प्रतीक्षा धीरज माळी (८४.८०).यशस्वी विद्याथ्यांचे संस्तेचे अध्यक्ष तथा धुळे जि.प.चे कृषी सभापती बापू खलाण, मुख्याध्यापक जगदीश पाटील, अरुण पाटील, सुनील माळी यांनी कौतुक केले आहे.
वडजाई (ता.धुळे)
येथील जवाहर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८३.६३ टक्के लागला आहे.प्रथम क्रमांक अजली अविनाश सोनवणे (८३.६३), द्वितीय आस्मिता धोंडु पाटील (७८), तृतीय क्रमांक अंकिता सुरेश देवरे(७७ टक्के) हिने मिळविला. यशस्वीतांचे कौतुक होत आहे.
शिंदखेडा
किसान विद्यालय
किसान विद्यालय शिंदखेडा या शाळेचा निकाल ९४.८० लागला. एकूण ६१पैकी ५८ विद्यार्थी पास झाले. यात प्रथम मयुर मोहन सिंग गिरासे ( ८७.८०), द्वितीय कावेरी शशिकांत पाटील ( ८७.६०), तृतीय विवेक प्रदीप सोनवणे (८५.८०), पाटील भूषण राजेंद्र व जगताप मयुरी गुलाबराव या विद्यार्थ्यांना संयुक्तिक ८३.८० गुण मिळाले तसेच विशाल राजेंद्र पाटील हा विद्यार्थी ८३.६० गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे साहेबराव खरकार, शालेय समिती चेअरमन वाल्मीक पाटील, संस्थेचे सचिव प्रकाश पाटील, मुख्याध्यापक डी. जी.पाटील,पर्यवेक्षक एस. एस. पवार आदींनी कौतुक केले.
मराठे विद्यालय
आण्णासाहेब एन. डी. मराठे विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. लागला. परीक्षेसाठी ६२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यात प्रथम भावेश संजय जाधव (९२.६०), द्वितीय वैभवी दिनेश मोरे (९०.४०), तृतीय निकीता विनोद सुर्यवंशी (८९.८०)यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष साहेबराव मराठे, सचिव अमोल मराठे, प्रवीण राजपूत यांनी कौतुक केले.
मालपूर
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील माध्यमिक विद्यालय मालपूर या शाळेचा निकाल ९४.७३ टक्के लागला. यात प्रथम पुजा पांडुरंग चव्हाण ८३, द्वितीय हेमंत जगन्नाथ अहिरे ८२.२० व तृतीय क्रमांक कोमल धर्मा धनगर ७९ टक्के, चौथा क्रमांक धनंजय राजेंद्र खंडेराय७७.८० हिने मिळविला.
चौगाव (ता.शिंदखेडा)
अटलजी वाजपेयी आश्रम शाळा चौगाव शाळेचा निकाल ८० टक्के लागला.यात प्रथम क्रमांक रोशनी सुरेश वंदे ७७टकके, द्वितीय घोडसे कृष्णा रंगराज ७२.६०, तृतीय महिरे आकाश सुरेश ७१.२० टक्के.विद्यार्थ्याचे चेअरमन रमेश बाबुराब सोनवणे, मुख्याध्यापक गजानन बच्छाव,अधिक्षक बाजिराव सोनवणे यांनी कौतुक केले.
दत्तवायपूर (ता.शिंदखेडा)
येथील श्री गुरुदत्त हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल ९६ टक्के लागला. गुणवंत विद्यार्थ्यांचा पिपंरखेडा ग्रामपंचायत व ग्रामस्थानी सत्कार केला.शाळेत प्रथम विशाल साहेबराव खैरनार (९०.८०), द्वितीय योगेश संजय पाटील (८८.२०), तृतीय क्रमांक दिनेश विनोद पाटील (८७.८०) याने मिळविला. गुणवंताचा पिंपरखेडाचे सरपंच विकास वाघ, शिंदखेडा भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.आर.जी.खैरनार, यांनी सत्कार केला. यावेळी उपसरपंच एकनाथ खैरनार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील,ग्रामस्थ व मुख्याध्यापक एस.एस. पाटील यांनी कौतुक केले.
नरडाणा
येथील विकास विद्यालय व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा १०वीचा निकाल ९६.७७ टक्के लालगा. यात प्रथम जान्हवी प्रभाकर पाटील (९०.४०), द्वितीय मनिष दगडू सुर्यवंशी, (८९),संध्या भानुदास पाटील (८९), तृतीय क्रमांक अजय मोहन शर्मा(८८.८०) याने मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष उदयराव दत्तात्रय सिसोदे, माजी सरपंच शिवप्रिया सिसोदे, युवक कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित सिसोदे, प्राचार्य सुनिल एच.सिसोदे आदींनी कौतुक केले आहे.
धमाणे
शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथील श्री विंध्यासिनी शिक्षण प्रसारक मंडळ धमाने संचलित नुतन माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयचा दहावीचा निकाल ८५.७१ टक्के लागला आहे. ऋषिकेश चंद्रसिंग गिरासे हा विद्यार्थी ८८.४ टक्के गुण मिळऊन मिळून विरदेल केंद्रात प्रथम आला. द्वितीय चेतना लालसिंग गिरासे (८६.२०), तृतीय क्रमांक माधुरी शरद पाटील (८५.८०) हिने मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष आर. डी. पाटील, मुख्याध्यापक एस. आर. पाटील, पर्यवेक्षक जे.एस.सोनवणे यांनी कौतुक केले.
पिंपळनेर
येथील कर्मवीर आ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७ टक्के लागला. यात तन्वी मनोज भदाणे (९४) ही केंद्रात व विद्यालयात प्रथम आली. द्वितीय कोमल सुरेश जाधव (९३.२), तृतीय क्रमांक ज्ञानेश संजय शिंपी (९२.६) याने मिळविला. विद्यार्थ्याचें ,पिंपळनेर एज्युकेशन सोसायटचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेंद मराठे तसेच संस्थेचे संचालक ए.एस.बिरारी, धनराजशेठ जैन, सुभाष शेठ जैन, एच्.आर.गांगुर्डे, डॉ.विवेकानंद शिंदे ,प्राचार्य ए.बी.मराठे व शिक्षकांनी कौतुक केले आहे.
अक्कलपाडा,ता-साक्री
येथील गौरव मधुकरराव गांगुर्डे माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.यात प्रथम गणेश संतोष कर्वे ( ८५.८०), द्वितीय माधुरी अनिल कर्वे (८५.६०), तृतीय दिनेश सिताराम वाघमोडे (८४.८०),चतुर्थ क्रमांक संजय लालचंद सोनवणे (८४.२०) याने मिळविला.विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा संजीवनी गागुर्डे, व मुख्याध्यापक गांगुर्डे यांनी कौतुक केले.
वसमार (ता.साक्री)
येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळविले. प्रथम प्रियंका रोहीदास आजगे (८४.२०), द्वितीय भारती रविंद्र पवार ( ७८.६०), तृतीय मनिष साहेबराव नेरे (७५.८०). विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक पी.डी. देवरे यांनी सत्कार केला. यावेळी आर.वाय.देवरे, एस.यु.सांळुखे, एस.एस.भदाणे, आर.बी.देवरे, जे.डी.देवरे, एस.एम.राठोड, पंकज देवरे, एस.डी.मुजगे, राकेश देवरे,सागर ठाकरे, दादाभाई धनगर, सुभाष मारनर, भाऊसाहेब आजगे, भिका भगत, रोहीदास आजगे, पिंटु आजगे, अमोल आजगे, उपस्थित होते.
कढरे (ता.साक्री)
माध्यमिक विद्यालय कढरे शाळेचा निकाल ९८ टक्के लागला. प्रथम तुषार झिपेसिंग राजपूत (९०.८०), द्वितीय पूजा गोरख चव्हाण (८९.८०), तृतीय क्रमांक विशाल बिजू पवार याने मिळविला. यशस्वीतांचे अध्यक्ष रोहीदास राठोड यांनी कौतुक केले आहे.
अनेर डॅम शाळा
बभळाज : माध्यमिक आश्रम शाळा अनेर डॅम शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम शरद सुरेश पावरा (८५.२०), द्वितीय राधेश्याम सुभाष पावरा (८३.४०), तृतीय क्रमांक सागर मकाराम पावरा (८२.६०) याने मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
तºहाडी
येथील आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील विद्यालयाचा निकाल ८८.४६ टक्के लागला. प्रथम.मयुरी संजय पाटील८४.२० टक्के, द्वितीय जयश्री दिपक पाटील ८२.८०, व तृतीय क्रमांक राकेश दिलीप पाटील ८०.८० टक्के याने मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामर,े उपाध्यक्ष निंबा नंथु भामरे, सचिव विजय भामरे कार्याध्यक्ष सुभाष भामरे मुख्याध्यापक एन एच कश्यप व प्राचार्य नितीन पाटील यांनी कौतुक केले.