Vidhan Sabha 2019 : ‘सारे काम छोड दो, पहिले वोट दो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 02:01 PM2019-09-27T14:01:58+5:302019-09-27T14:05:56+5:30

आरावे विद्यालय : मतदान टक्केवारी वाढीसाठी उपक्रम

'Give up all work, vote first' | Vidhan Sabha 2019 : ‘सारे काम छोड दो, पहिले वोट दो’

dhule

Next

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील आरावे माध्यमिक विद्यालयातर्फे मतदानाची टक्केवारी वाढीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सार्वजनिक सेवा मंडळाचे माध्यमिक विद्यालय आरावे येथे विद्यार्थ्यांनी डोक्यावर गांधी टोपीसह विशिष्ट पोशाख परिधान करुन रॅलीच्या माध्यमातून गावकऱ्यांचे लक्ष वेधुन घेतले. 'सारे काम छोड़ दो, सबसे पहले वोट दो', जागे व्हा-मतदान करा' असा नारा करत सायकल रॅलितून मतदान जनजागृती केली. या रॅलीला विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एस. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून ‘एक पत्र मतदानासाठी’ उपक्रमांतर्गत पालक, त्यांचे नातेवाईक यांना पत्रलेखनाच्या माध्यमातून मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी मतदान १०० टक्के व्हावे, तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी सुद्धा मतदान करुन आपले कर्तव्य पार पाडावे याबाबत विद्यालयाचे शिक्षक व्ही.आर. भामरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिक्षक वाय.ए. पाटील, एल.एच. करनकाल, एम.ए. बोरसे, व्ही.आर. भामरे, जी.डी. कोकणी, एन.डी. सैंदाणे, के.व्ही. बच्छाव, वाय.आर. बच्छाव आदिंनी परिश्रम घेतले.
मालपूरला रॅली
मालपूर - शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्यावतीने वेगवेगळ्या प्रयोग करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातून रॅली काढली. त्यानंतर मतदारांना पत्र पाठवून मतदानासाठी जागृत करण्यात आले. निबंध स्पर्धा देखील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी प्राचार्य थॉमस, चेअरमन युवराज सावंत, कैलास सावंत, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 'Give up all work, vote first'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे