शेतकऱ्यांना व्यापाराचे स्वातंत्र्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 08:40 PM2020-10-03T20:40:41+5:302020-10-03T20:40:59+5:30
शेतकरी संघटनेतर्फे धरणे आंदोलन : घोषणांनी परिसर दणाणला, प्रशासनाला दिले मागण्यांचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर/कापडणे : केंद्र सरकारने नुकताच कृषी विषयक कायदा मंजूर केला आहे.याचे शेतकरी संघटनेने स्वागत केले आहे. मात्र शेतकऱ्यांना माल विक्रीचे, व्यापाराचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे या साठी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकरी संघटनेतर्फे धुळ्े व पिंपळनेर येथे धरणे आंदोलन केले
केंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्याचे समर्थन शेतकरी संघटनेच्यावतीने करून पाठिंबा देण्यात आला. मात्र शेतकºयांना आपला माल विक्रीचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे यासाठी चिंतन धरणे आंदोलन करण्यात आले. संटघनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निर्यात व्यापार धरसोडीच्या धोरणामुळे परराष्ट्रीय व्यापारातील संबंध बिघडत आहेत. शेतीमालाच्या परराष्ट्र व्यापाºयावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे. अशी तरतूद देशाला घातक असून सध्या लादलेल्या कांदा निर्यात बंदीची उदाहरणे सांगत सरकारने शेतीमाल व्यापार, प्रक्रिया व आयात निर्यातीतील हस्तक्षेप पूर्णपणे थांबून शेतरक्यांना व्यापाराचे पूर्ण स्वातंत्र्य द्यावे ही शेतकरी संघटनेची मागणी आहे.
पिंपळनेर चेअपर तहसीलदार विनायक थविल यांना निवेदान देतांना शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत भदाणे, भटू जिभाऊ, शांताराम गांगुर्डे, जगन्नाथ राजपूत, गंगाधर काळे, शाम शिरसाठ, योगेश जाधव, दादाजी बिरारीस, शांताराम गांगुर्डे, भिकन बिरारीस शांताराम बिरारीस, बी. डी. महाले, शिलनाथ एखंडे, दिलीप गोविंदा, विनायक कुलकर्णी, महेंद्र खैरनार, दाभाडे, रमाकांत गांगुर्डे, विठ्ठल बोरस,विश्वास भदाणे, गिरीश बागुल, सुधाकर कोठावदे, एकनाथ गवळी, नारायण भदाणे, व श्रीराम ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते.