१२ हजार ग्राहकांनी सोडली गॅस सबसिडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:00 AM2017-08-10T01:00:15+5:302017-08-10T01:02:25+5:30

give up lpg subsidy | १२ हजार ग्राहकांनी सोडली गॅस सबसिडी

१२ हजार ग्राहकांनी सोडली गॅस सबसिडी

Next
ठळक मुद्दे १२ ग्राहकांनीच केले आधारकार्ड क्रमांक लिकिंग३ लाख ५५ हजार ११७ गॅसधारक

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सरकारतर्फे गॅसवर मिळणारी सबसिडी सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला धुळे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १२ हजार ८०२ ग्राहकांनी त्यांची गॅस सबसिडी सोडल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे.  तर जिल्ह्यातील ३ लाख ५५ हजार ११७ गॅस धारकांपैकी अद्याप ३१ हजार ४८९ गॅसधारकांनी गॅस सबसिडी मिळण्यासाठी त्यांच्या बँक खात्याशी आधारकार्ड क्रमांक संलग्न न केल्यामुळे सबसिडीचा लाभ त्यांना मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. 
देशातील ग्रामीण भागात आजही गॅस मिळत नसल्यामुळे अशा ठिकाणी वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणावर होत आहे. ते रोखण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरजू जनतेला गॅस सिलिंडर व किटचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच गॅस सबसिडीचा खरोखरच गरजू व्यक्तींना लाभ घेता यावा, यासाठी आर्थिकदृष्टया सक्षम लोकांनी गॅस सबसिडी सोडावी, असे आवाहन सरकारने केले होते. 
ज्या ग्राहकांनी त्यांची गॅस सबसिडी सोडली आहे. त्याची माहिती गॅस वितरक एजन्सीमार्फत आॅनलाइन जाहीर करण्यात आली होती. त्याची नोंद जिल्हा पुरवठा विभागाकडेही झाली असून त्याचा अहवालही शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
वर्षभरात १२ ग्राहकांनीच केले आधारकार्ड क्रमांक लिकिंग 
जिल्ह्यात एकूण २४ गॅस एजन्सीज् आहेत. या सर्व एजन्सीचे मिळून एकूण ३ लाख ५५ हजार ११७ ग्राहक आहेत. पैकी ३१ हजार ४८९ ग्राहकांनी गॅस सबसिडी मिळण्यासाठी त्यांच्या बँक खात्याशी लिकिंग केलेले नाही. गेल्यावर्षी ३१ हजार ५०१ ग्राहकांनी आधारकार्ड क्रमांक बॅँक खात्याशी लिकिंग केलेला नव्हता. म्हणजे वर्षभरात केवळ १२ गॅस धारकांनीच सबसिडी मिळण्यासाठी आधारकार्ड बॅँक खात्याशी लिकिंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
दीड लाख ग्राहकांकडे दोन सिलिंडर 
धुळे जिल्ह्यात १ लाख ५५ हजार ११७ ग्राहक दोन सिलिंडरचा वापर करतात. तर १ लाख ९८ हजार ६३८ ग्राहक हे एकच सिलिंडर वापरत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे. 
धुळे तालुक्यात गॅसधारक ग्राहकांची एकूण संख्या १ लाख ९४ हजार ८३६ इतकी आहे. पैकी ९ हजार ८५० ग्राहकांनी गॅस सबसिडी सोडली आहे; तर साक्री तालुक्यात ५४ हजार ३५८ गॅस धारकांपैकी केवळ ९६ , शिरपूरला ५२ हजार ६४१ गॅसधारकांपैकी १,५४५ तर शिंदखेड्यात ५३ हजार २८२ गॅसधारकांपैकी १ हजार ३११ गॅसधारकांनी सबसिडी सोडली        आहे. 
 

Web Title: give up lpg subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.