एकहाती सत्ता द्या; शहराचा चेहरामोहरा बदलवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 09:19 PM2017-12-08T21:19:50+5:302017-12-08T21:21:53+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : शिंदखेड्यात भाजपाची प्रचारसभा; कर चुकवेगिरी टाळण्यासाठी करणार मालमत्तांचे सॅटेलाईट मॅपिंग

Give power to power; Change the face of the city | एकहाती सत्ता द्या; शहराचा चेहरामोहरा बदलवू

एकहाती सत्ता द्या; शहराचा चेहरामोहरा बदलवू

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्याच्या सभेनिमित्त सभास्थळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चारही बाजुंना कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सभेला येणाºया प्रत्येक नागरिकांची कडेकोट तपासणी ही केली जात होती. गालबोट लागू नये, म्हणून कृउबा शेजारी असलेल्या बसस्थानाच्या इमारतीवरमुख्यमंत्री फडणवीस हे बोलत असताना ढोल, ताशांचा जोरदार आवाज येऊ लागला. मंचावरूनच मुख्यमंत्र्यांनी बॅन्ड बाजा बंद करा, अशी विनंती केली. त्यांच्या आदेशाचे पालन लागलीच बॅन्ड बाजा बंद झाला. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी बॅन्ड बाजा बंद करणारे आपलेच लोक असावे,सभेला ५००० नागरिकांची उपस्थिती असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. त्यात महिलांची संख्या ही लक्षणीय दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : ‘मी स्वत: खाणार नाही, दुसºयालाही खाऊ देणार नाही’, ‘भ्रष्टाचार करणार नाही, कोणालाही करू देणार नाही’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वातही केंद्र व राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला बहुमताने सत्ता दिल्यास या शहराचा चेहरामोहरा बदलवून दाखविण्याची आमचार निर्धार असून मालमत्तांची कर चुकवेगिरी थांबविण्यायासाठी सॅटेलाईटद्वारे मालमत्तांचे मॅपिंग करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. 
शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीनिमित्त शुक्रवारी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भारतीय जनता पार्टीची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे,  राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी (ग्रामीण), प्रा. अरविंद जाधव, डॉ. जितेंद्र ठाकूर, जि.प.चे सदस्य कामराज निकम, मनोहर भदाणे, भाजापच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी वानखेडे, अनिल वानखेडे, राहुल रंधे, अशोक देसले, संजिवनी सिसोदे आदींसह व निवडणूक लढविणारे भाजपाचे उमेदवार उपस्थित होते. 
घरांसाठी जेवढा निधी लागेल
तेवढा उपलब्ध करून देणार 
बेघरांना २०१९ पर्यंत घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. नगरपंचायतीत भाजपाची सत्ता येथे आल्यानंतर बेघरांना घरांसाठी तत्काळ डीपीआर सादर करून तो शासनाकडे सादर करावा, बेघरांना हक्काच्या घरासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 
स्थानिक संस्था स्तरावर पारदर्शक कारभार आणणार! 
भाजपा सरकार आल्यानंतर पारदर्शक कारभारावर भर दिला आहे. ई-गव्हर्नन्स प्रणाली सर्वसामान्यांच्या सोयीची ठरत आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतस्तरावर पारदर्शक पारभार आणण्यासाठी नागरिकांच्या मालमत्तांचे थेट सॅटेलाईट मॅपिंग केले जाणार आहे. त्यामुळे कर चुकवेगिरी करणाºयांना चाप बसणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे सांगितले. 
शहरीकरणाला  अभिशाप समजू नका 
२०११ साली झालेल्या जनगणनेनुसार लोकसंख्येचा विचार केल्यास शहरात व ग्रामीण भागात ५० टक्के लोकसंख्या विभागली गेल्याचे चित्र समोर आले आहे. शहरीकरण वाढले आहे. त्यामुळे शहीरकरणाला अभिशाप समजू नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यांनी शहरांमध्ये विकास, शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या. तसेच भूमिगत गटारी, बेघरांना घरे, १४ व्या वित्त आयोगाची योजना लागू कराव्यात,  असे सूचित केले आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारचे नियोजन असल्याचे येथे सांगण्यात आले. 
परिवर्तनाची वेळ आहे; साथ द्या 
केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आहे. शहराचा विकास साधायचा असेल, तर हीच परिवर्तनाची वेळ आहे. त्यादृष्टीने नगारिकांनी भाजपाला सत्ता द्यावी. मी, मंत्री भामरे व रावल आम्ही तिघेही विकासाची हमी देतो. विकास न झाल्यास येथील नगराध्यक्ष व भाजपाच्या पदाधिकाºयांना जाब न विचारता, थेट आम्हांला विचारावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे केले.

कच-यावर प्रक्रिया करून पैसे कमविता येतात...
जिल्ह्यात दोन मंत्री आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे २१ कोटींची शिंदखेडा पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. शिंदखेडा तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणारा सुलवाडे-जामफळ योजनेचा प्रश्न मार्गी लागला यासाठी मंत्री भामरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे शहराचा विकासात्मक काम करण्यासाठी नगरपंचायतीत भाजपाला सत्ता दिल्यास शहरात विकासात्मक परिवर्तन तुम्हांला दिसेल. विजय आम्हांला दिल्यानंतरही विकास कामे तुम्हांला न दिसल्यास तुम्ही थेट आम्हांला जाब विचारा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे केले. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये कचरा, अस्वच्छतेमुळे बकाल स्वरूप आले आहे. परिणामी, अस्वच्छता होऊन ती  रोगराईला निमंत्रण देत आहे. सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांना कचºयाचे विलगीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. या कचºयाच्या माध्यमातून राज्य सरकारने ‘हरित सिटी ब्रॅन्ड’ हा खत प्रकार तयार केला आहे. या खताला राज्यातील शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीसाठी सरकारने हे पाणी तेथील महावितरण कंपनीला विकले. त्यामाध्यमातून सरकारला कोट्यवधी रुपये मिळाले. तसेच औरंगाबाद शहरातील सांडपाणी हे परळी औष्णीक केंद्राला विकले. नांदेड येथील महापालिकास्तरावरही असा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे शिंदखेडा नगरपंचायतीत सत्ता आल्यास येथील स्तरावरही असे प्रयोग राबवून त्याद्वारे शहराचा विकास करता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

..तर नागरिकांनो जाब आम्हांला विचारा!

 मंत्री जयकुमार रावल म्हणाले, की  आतापर्यंत भाजपाकडे सत्ता नसल्यामुळे शहराचा विकास होऊ शकला नाही. शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली गेल्या तीन दशकांपासून पाठपुरावा करीत आहे.  तरीही प्रश्न सुटू शकलेला नव्हता. परंतु, भाजपाचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शहराची पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली. त्यामुळे येथील जनतेचा तीन दशकांचा वनवास आता संपला आहे. तसेच सुलवाडे, जामफळ योजना मंजूर झाल्यामुळे दीड लाख एकर बागायती होणार आहे. त्यामुळे शहरात आणखी विकास कामे  करण्यासाठी भाजपाला सत्ता द्यावी, असे मंत्री रावल म्हणाले.
 

Web Title: Give power to power; Change the face of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.