तरुणांच्या हाताला काम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 09:45 PM2020-09-10T21:45:31+5:302020-09-10T21:45:52+5:30
युवक काँग्रेस : प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मोदी सरकारवर टीका
धुळे : बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने युवक नैराश्यात जात आहेत. आत्मह्या वाढल्या आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीच्या आश्वासनाला जागून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरणांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.
धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरूवारी निदर्शने करीत बेरोजगारीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदीमुळे उद्योगांना फटका बसल्याने देशात बेरोजगारी वाढली. बेरोजगारीचा दर १३ ते २७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच कोरोनाच्या संसर्गात कोणतेही नियोजन करता लादलेल्या लॉकडाऊनमुळे १२ ते १३ कोटी लोक बेरोजगार झाले. केंद्र सरकारचा लहरीपणा आणि चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखीळी झाली. एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीचा दर शून्याखाली घसरला आहे. संविधानाने ठरवून दिलेल्या संघराज्यीय रचनेचा आदर न करता, राज्यांना विश्वासात न घेता केंद्र सरकार आडमुठेपणाने कारभार करीत आहे. पंतप्रधान मोदींच्या २० लोख कोटींच्या आर्थिक पॅकेजचा बेरोजगार तरुण, शेतकरी, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्राला काहीही फायदा झाला नाही.
निदर्शने करताना धुळे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, रणजित पावरा, अविनाश शिंदे, मुकेश पाटील, दिनेश पावरा, सर्कल पावरा, श्रीकांत माळी, विनोद गर्दे, लंकेश पाटील, अब्बास अन्सार, अबुलास खान, पंकज चव्हाण, कुलदीप निकम, अरविंद पावरा, गेंद्या पावरा, राकेश राजपूत यांच्यासह पदाकिारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.