देता की जाता वाल्मिक सेनेने दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:28 PM2018-12-14T22:28:52+5:302018-12-14T22:29:31+5:30

शिरपूर : वाल्मिक सेनेची जिल्हा कार्यकारिणीची निवड व नियुक्ती पत्र वाटप

Given Valmick Sena gave the signal | देता की जाता वाल्मिक सेनेने दिला इशारा

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी जमातीवर या नाकर्त्या शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत देता की जाता असा इशारा  आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना दिला़ तसेच आदिवासी वाल्मिकलव्य सेनेची धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली़
 आर.सी.पटेल जिमखान्याच्या प्रांगणात आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली  वाल्मिकलव्य सेनेची जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी बैठक घेण्यात आली़
याप्रसंगी धुळे जिल्हा प्रमुख पवन सोनवणे, संदीप कोळी, चंद्रकांत सोनवणे, रावसाहेब ईशी, रोहीत सोनवणे, मनोज कोळी, किरण कोळी, राहुल सोनवणे, वेडू कोळी, गोपाल कोळी,  सागर कोळी, नागेश कोळी, राहुल कोळी, दिपक श्रीराव यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले़
यावेळी नवनिर्वाचित सरपंच, पोलीस पाटील यांना आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्यावतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला़
बैठकीस जेष्ठ समाजसेवक इंदास आप्पा चित्ते, किशोर बागुल, प्रभाकर सोनवणे, गणदास ठाकरे, अमोल सावळे, संजय सोनवणे, गुलाब निकम, डोंगर कोळी, मनोहर वाघ, अभिमन ईशी, मगरे, सुनिल आखडमल, एऩडीक़ोळी, दिनेश धनराज, वासुदेव चित्ते, संजय मगरे, बबलू कोळी, राजधर कोळी, किरण सावळे, गणेश कोळी, चंद्रकांत कोळी, छोटू ईशी, जयपाल महाराज, गोरख सदाराव, सुकदेव सदाराव, जगन शिरसाठ, वाल्मिक कोळी, गोलू शिंदे, मुकेश ईशी, भटू ईशी, भावडू ईशी, दिनेश कोळी, दिलीप कोळी, दिपक कुवर, भटु कोळी, सुकलाल शिरसाठ, दिनेश कोळी, धनराज, किशोर शिरसाठ, राकेश कोळी, शेखर कोळी, विजु बागुल, योगेश सोनवणे, ईश्वर सोनवणे आदी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन रमेश शिरसाठ यांनी केले़

Web Title: Given Valmick Sena gave the signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे