बिबट्याचा हल्ल्याने गोºहा फस्त; शेतकऱ्यांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 11:23 PM2020-01-03T23:23:30+5:302020-01-03T23:23:44+5:30

वसमार येथील घटना : हिंसप्राण्याची बंदोबस्त करण्याची मागणी

 GOATA FOOT WITH BIBTICAL ATTACK; Fears among farmers | बिबट्याचा हल्ल्याने गोºहा फस्त; शेतकऱ्यांमध्ये भीती

Dhule

googlenewsNext

म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार येथील मैयकी शिवारात बिबट्याने शेतातील पाळीव प्राणी फस्त केला़ यामुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़
वसमार येथील संजय श्रावण आजगे यांचे शेतात गाय, बैल, वासरी गोरा असे पाळीव प्राणी बांधलेले होते़ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने तीन वर्षांचा गोरावर हल्ला चढवत फस्त केले़ सकाळी शेतात काढण्यासाठी आजगे यांना गोठ्यात एक गोरा दिसून आला नाही़ त्यांनी आजु-बाजूस तपास केला़ मात्र कुठेही मिळून आला नाही़ त्यानंतर काही अंतरावर त्यांना गोरा बिबट्याने फस्त केलेला दिसून आला़ संजय आजगे यांनी याबाबत वसमार येथील ग्राम पंचायत संगणक परिचालक जयवंत सासके यांना माहिती दिली़ त्यानंतर वन विभागाचे वनरक्षक एल. आर. वाघ, वनकर्मचारी रमेश बच्छाव यांनी या घटनेचा पंचनामा करून जीपी एसव्दारे फोटो काढला़ बिबट्याच्या दहशतीमुळे नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झालेले दिसत आहे.
साक्री तालु्क्यातील म्हसदी परिसरात वारवांर बिबट्याचा पशुधनावर हल्ला होतो़ त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते़ वनविभागाच्या अधिकाºयांनी हिंसप्राण्यांचा बंदोबस्त करावी अशी मागणी वसमार येथील माजी सरपंच भरत नेरे, शेतकरी समाधान देवरे, रावसाहेब बुधा देवरे पंचनामा वेळी अधिकाºयांकडे केली़

Web Title:  GOATA FOOT WITH BIBTICAL ATTACK; Fears among farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे