देवपुरात वीज कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा

By admin | Published: March 5, 2017 11:48 PM2017-03-05T23:48:53+5:302017-03-05T23:48:53+5:30

धुळे : वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना शनिवारी सकाळी देवपुरातील मोचीवाड्यात घडली़

Godfruits face grievous bodily injury | देवपुरात वीज कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा

देवपुरात वीज कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा

Next


धुळे : वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना  शनिवारी सकाळी देवपुरातील मोचीवाड्यात घडली़
याप्रकरणी पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
वीज वितरण कंपनीतर्फे थकीत वीज बिल वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे़ त्यानुसार वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी ४ मार्च रोजी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास देवपुरातील पीतांबर चौक ते अंडाकृती बगिच्याकडे जाणाºया रोडवरील मोचीवाड्यात वीज बिल वसुलीसाठी गेले होते़
तेव्हा तेथे लाईट बिल वसुलीसाठी का आले? अशी विचारणा करत कन्हैया मांगीलाल बर्वे (रा़मोचीवाडा) याच्यासह काही जणांनी कर्मचाºयांशी वाद घातला़ कनिष्ठ तंत्रज्ञ किरण दत्तात्रय माने, वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक नाना चौधरी व  कर्मचारी भास्कर लाटू कुंटेवाड (वय ५९ राक़ोंडाजी व्यायामशाळेजवळ मोगलाई, धुळे) यांना शिवीगाळ करून मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला़ 
याप्रकरणी भास्कर कुंटेवाड यांनी देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कन्हैया बर्वेसह तिघांविरुद्ध  भांदवि कलम ३५३, ३३२, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
वीज कर्मचाºयांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी़ओ़ सोनवणे करीत आहेत़
 

Web Title: Godfruits face grievous bodily injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.