राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत गोराणेची जोडी प्रथम; ३१ बैलगाडा स्पर्धकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 07:14 PM2023-05-05T19:14:32+5:302023-05-05T19:14:40+5:30

शहरातील शेतकरी व ग्रामस्थ मंडळातर्फे शहरात प्रथमच गुरुवारी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती.

Goran pair first in state level bullock cart race Participation of 31 bullock cart competitors | राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत गोराणेची जोडी प्रथम; ३१ बैलगाडा स्पर्धकांचा सहभाग

राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत गोराणेची जोडी प्रथम; ३१ बैलगाडा स्पर्धकांचा सहभाग

googlenewsNext

 भिका पाटील 

धुळे : शहरातील शेतकरी व ग्रामस्थ मंडळातर्फे शहरात प्रथमच गुरुवारी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत राज्यभरातून ३१ बैलगाडे सहभागी झाले होते. स्पर्धेत गोराणे येथील शेतकऱ्यांच्या बैलजोडीने पटकावला. नाना चौधरी, संतोष देसले, विक्की पाटील, मयूर भामरे,शुभम भामरे, चेतन देसले यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता विरदेल रोडवरील शेतात बैलगाडी शर्यत घेण्यात आली. दुपारी अडीच वाजता ही शर्यत सुरू होती. 

स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष हेमंत साळुखे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत गोराने, ता. शिंदखेडा येथील बैलगाडी मालक गणेश दिलीप पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तर द्वितीय क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे बक्षीस शिंदखेडा येथील विजय नवल पाटील व जगदीश शिवदास मराठे यांना विभागून बक्षीस देण्यात आले, तसेच तृतीय क्रमांक राजपाल पाटील, नाना परशुराम माळी यांना प्रत्येकी ५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. चतुर्थ बक्षीस नाना चौधरी यांना ५ हजार रुपये देण्यात आले, तर उत्तेजनार्थ हातनूर, ता. शिंदखेडा येथील बैलगाडी मालक गोपाल पाटील यांना ३१०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
 

Web Title: Goran pair first in state level bullock cart race Participation of 31 bullock cart competitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे