गोरक्षकांनी पाठलाग करून ट्रक पकडला

By admin | Published: February 6, 2017 12:01 AM2017-02-06T00:01:34+5:302017-02-06T00:01:34+5:30

अवधान टोलनाक्याजवळील घटना : दोन जणांना चोप, एक फरार

The Gorkhara pursued the truck and caught the truck | गोरक्षकांनी पाठलाग करून ट्रक पकडला

गोरक्षकांनी पाठलाग करून ट्रक पकडला

Next

धुळे : नंदुरबार येथून गोमांस घेऊन वाशी (नवी मुंबई) येथे जाणारा ट्रक धुळ्यातील गोरक्षकांनी पाठलाग करून अवधान टोलनाक्यापुढे पकडला़ या वेळी दोन जणांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला़, तर एक जण फरार झाला़  ट्रकमध्ये 5 टन गोमांस आढळून आल़े दोघांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल़े पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आह़े याप्रकरणी चार जणांविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला.
धुळ्यातून एका ट्रकमधून विनापरवानगी गोमांसची वाहतूक होत असल्याचे रविवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास काही गोरक्षकांच्या लक्षात आल़े त्यांनी पाठलाग करून साडेबारा वाजेच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावरील अवधान टोलनाक्यापुढे ट्रकला (क्ऱ एमएच 23- डब्ल्यू 3575) पकडल़े ट्रकची तपासणी केली असता त्यात गोमांस भरलेले दिसून आल़े त्यामुळे गोरक्षकांसह संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ट्रकच्या काचेवर दगडफेक केली़ त्यादरम्यान एक जण फरार झाला़ तर ट्रकचालक अजीज नासेर खाँ पठाण (वय 25, रा़ 57, जि़ प शाळा, बालाजी मंदिराजवळ, केज ता़ जि़ बीड) व सहचालक  रफीक हानिफ शेख (वय 27, रा़ वडासागाव, सावित्रीबाई फुलेनगर, नाशिक) या दोघांना चोप दिला़ त्यात दोघे जखमी झाल़े घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाल़े त्यांनी 2 लाख 90 हजारांचे 5 टन गोमांस व 6 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केल़े  तसेच दोघा जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल़े याप्रकरणी संजय रामेश्वर शर्मा (रा़ आग्रा रोड, धुळे) यांनी मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक अजीज पठाण, सहचालक रफीक शेख, ट्रक मालक जावेद आवेद मियाँ कुरेशी (रा़कुरेशी मोहल्ला, मोमीनपुरा, बीड) व अन्य एक जण यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षक (सुधारणा) अधिनियम 2015 चे कलम 5 (क), 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

Web Title: The Gorkhara pursued the truck and caught the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.