गोवर, रूबेला लसीकरण मोहीम यशस्वी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:10 PM2018-11-26T23:10:35+5:302018-11-26T23:11:14+5:30
जिल्हाधिकारी राहुल रेखावार : महाजन हायस्कूलसह कापडणे येथे आज मोहिमेचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गोवर मुक्त देश करण्यासाठी राज्यात गोवर रूबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे़ यासाठी प्रशासनाकडून अगंणवाडीसह जिल्हा परिषदेतील ९ ते १५ वयोगटातील ६ लाख ४५ हजार ८८८ विद्यार्थ्यांना गोवर रूबेला लसी देण्याचे उदिष्टये देण्यात आले आहे़ पालकांनी या मोहीमेत सहभागी होवून लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माणिक सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.बी.बी. माळी आदी उपस्थित होते. चार महिन्यापासून गोवर, रूबेला लसीकरणाबाबत जिल्हा परिषद, व जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागप्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ २०२० पर्यंत भारत गोवर मुक्त होण्यासाठी राज्यात लसीकरणाचा मोहिम राबविण्यात येत आहे़ आतापर्यंत २० राज्यात यशस्वीपणे लसीकरण मोहीम राबण्यिात आली आहे़ त्यांनतर महाराष्ट्रात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे़
जनजागृती करण्यासाठी शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग, आयएमए , बालरोग तंत्र संघटना, लायन्स क्लब, एनसीसी, समाज कल्याण विभाग, पंचायत राजविभागाची मदत घेण्यात येत आहे़ जिल्ह्यात गोवर लसीकरण मोहीम पाच आठवडे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ४ हजार ९९४ सत्र घेतली जाणार आहे. शहरासह ग्रामीण भागातील ४ लाख ४१ हजार १४४ लाभाथी शाळेतील, तर अन्य शाळा बाह्य लाभार्थींना ही लस दिली जाणार आहे़ तर अन्य २ लाख ४ हजार ७४४ मुलांना अंगणवाडी केंद्रात लस जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले़
जिल्ह्यात सात मोबाईल पथक कार्यरत करण्यात
गोवर रूबेला लसीकरणापासून लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे़
दुर्गम भागातील आदिवासी पाडे व इतर वस्त्यांपर्यंत लसीकरण व्हावे या उद्दिष्टाने सात मोबाईल पथक कार्यरत करण्यात आले आहे. यासाठी रूग्णवाहिका, दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे़ दरम्यान प्रत्येक प्राथमिक आरोेग्य केंद्र, सार्वजनिक ठिकाणी लस दिली जाणार आहे़
जिल्हाधिकाºयांच्या कन्येला आज लसीकरण़़
गोवर, रूबेला लसीकरण पालकांनी आपल्या मुलांना न केल्यास भाविष्यातील आजारांना मुलांना सामोरे जावे लागू शकते़ यासाठी गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उद्या मंगळवारी सकाळी ९ वाजता शहरातील देवपूर येथील महाराज हायस्कूल तर तालुक्यात कापडणे येथील आरोग्य केंद्रात केला जाणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार स्वत: आपल्या कन्येला ही लस टोचून घेऊन या मोहीमेत अधिकाºयांसह सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले़