सरकारी ठेकेदारांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 08:59 PM2020-05-20T20:59:55+5:302020-05-20T21:00:26+5:30

लॉकडाउन : देयके अदा करण्याची मागणी

Government contractors also hit | सरकारी ठेकेदारांनाही फटका

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सरकारी ठेकेदारांना देखील कोरोना लॉकडाउनचा फटका बसला आहे़ मार्च अखेरची देयके न मिळाल्यामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असून अनामत रक्कम परत मिळावी अशी मागणी बिल्डर असोसिएशन आॅफ इंडियाने केली आहे़
असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष भारत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शाखेचे चेअरमन कुणाल सोनार, ए़ बी़ वाघ, पंकज देशमुख, सुनील पवार, मिलिंद मुडावदकर, सेके्रटरी दीपक अहिरे आदींच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे, जिल्हा परिषद बांधकाम, लघु सिंचन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले़
निवेदनात म्हटले आहे की, २२ मार्चपासून लॉकडाउन असल्याने मार्च अखेरची देयके प्रलंबित आहेत़ त्यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत़ कामगाराचे वेतन, शासकीय भरणा, बांधकाम साहित्य पुरवठादारांचे पेमेंट करणे कठीण जात आहे़ दरम्यान, देखभाल दुरुस्तीची कामे पावसाळ्याआधी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत़ परंतु निधीअभावी ठेकेदारांना कामे करण्यास अडचणी येणार आहेत़ पूर्ण झालेल्या कामांची देयके निधीअभावी प्रलंबित असली तरी अशा कामांची अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम परत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे यासंदर्भात नागपूर आणि औरंगाबादच्या मुख्य अभियंत्यांनी तसे आदेश पारित केले आहेत़
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामे करताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर यंत्र आदी खर्च वाढणार असल्याने या खर्चाचा समावेश यंदाच्या डीएसआरमध्ये करावा, बांधकाम क्षेत्राला देखील आर्थिक पॅकेज द्यावे, मजुर उपलब्ध होत नसल्याने सद्यस्थितीत चालु कामे तसेच नविन कामांना सरसकट एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी नविन कामे उपलब्ध करुन ५० टक्केपेक्षा अधिक निधीची तरतूद करावी, येत्या मार्चअखेरपर्यंत गौण खनिजाची रॉयल्टी अंतीम देयकातून कपात करावी़

Web Title: Government contractors also hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे